×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
बर्फाचे तट पेटूनि उठले सदन शिवाचे कोसळले... १९६२ च्या भारत चीन युद्ध पृष्ठभूमीवर लिहिलेली ही कविता आहे.
सोमवार, 22 जून 2020 (09:26 IST)
बर्फाचे तट पेटूनि उठले
सदन शिवाचे कोसळले
रक्त आपुल्या प्रिय आईचे
शुभ्र हिमावर ओघळते!
असुरांचे पद भ्रष्ट लागुनि
आज सतीचे पुण्य मळे
अशा घडीला कोण करंटा
तटस्थतेने दूर पळे?
कृतांत ज्वाला त्वेषाची
ना कोणाच्या हृदयात जळे
साममंत्र तो सारे, राणीची
नौबत आता धडधडते !
रक्त आपुल्या प्रिय आईचे
शुभ्र हिमावर ओघळते!
सह्यगिरीतील वनराजांनो,
या कुहरातुनि आज पुढे
रक्त हवे जर स्वतन्त्रतेला
रक्ताचे पडतील सडे
एक हिमाचल राखायास्तव
करा हिमाचल लक्ष खडे
समरपुराचे वारकरी हो,
समरदेवता बोलविते!
रक्त आपुल्या प्रिय आईचे
शुभ्र हिमावर ओघळते!
खडक काजळी घोटुनि तुमचे
मनगट-बाहू घडलेले
कडेकपरिमधील वणवे
उरात तुमच्या दडलेले
काबुल-कंदाहार पथावर
डंके तुमचे झडलेले
शिवतेजाची दीपमाळ
पाठीशी अपुल्या पाजळते!
रक्त आपुल्या प्रिय आईचे
शुभ्र हिमावर ओघळते!
कोटी कोटी असतील शरीरे-
मनगट अमुचे एक असे
कोटी कोटी देहात आजला
एक मनीषा जगतसे
पिवळे जहरी सर्प ठेचणे
अन्य मना व्यवधान नसे
एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो
राहील रण हे धगधगते!
रक्त आपुल्या प्रिय आईचे
शुभ्र हिमावर ओघळते!
- कुसुमाग्रज
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
मराठी भाषा गौरव दिनी उलगडणार मराठी भाषेचा प्रवास आणि प्रवाह
कुसुमाग्रज (विष्णु वामन शिरवाडकर)
मराठी भाषा गौरव दिन.....
प्रेम म्हणजे.....
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
नक्की वाचा
प्रेमविवाह योग्य आहे की अयोग्य? प्रेमानंद जी महाराज म्हणाले, जर त्यांच्या मुलांनी असे पाऊल उचलले तर पालकांनी काय करावे?
अपमृत्युहरं महामृत्युञ्जय स्तोत्रम Apamrutyuharam Mahamrutyunjjaya Stotram
४ जून रोजी महेश नवमीला चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल, या ३ राशींचे बिघडलेले काम पूर्ण होईल
तूळ राशीच्या मुलींसाठी नावे अर्थासहित
सतत बसण्याची सवय हृदयरोगाचा धोका वाढवते, सतर्क व्हा
नवीन
Kiwi Ice Cream थंडगार किवी आइस्क्रीम रेसिपी
पोटाची चरबी आणि सूज कमी करू शकतात काळे तीळ, कसे खावे जाणून घ्या
बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम संगणक विज्ञान अभ्यासक्रम,उत्तम करिअर घडवण्याची संधी
रात्री झोपण्यापूर्वी तेलकट त्वचेवर काय लावावे
मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका, हे आजार असू शकते
अॅपमध्ये पहा
x