कृती- कोफ्ते बनवण्याच्या अगोदर खसखसला स्वच्छ करून धुऊन भिजत ठेवावे. 1/2 तासानंतर त्याला वाटून घ्यावे. कांदा, लसूण, आले यांना सोलून ठेवावे. तूप गरम करावे त्यात तेजपान व कच्च्या मसाल्याची फोडणी टाकावी. चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतावे. त्यात थोडेसे पाणी टाकूण मीठ व मसाले परतावे. मसाला चांगला परतून झाल्यावर 1/4 भाग मसाला खिम्यात टाकून चांगले एकजीव करावे. आता एका कडाईत तूप तापत ठेवावे व त्यात खिम्याचे भजे तळावे. आता उरलेला मसाल्याची आमटी बनविण्यासाठी थोडे पाणी टाकून झाकण ठेवावे. 4-5 उकळी आल्यावर तयार भजे टाकून 2-3 उकळी आणून गरमा गरम मटणचे कोफ्ते पोळीसोबत सर्व्ह करावे.