Egg Paratha Recipe : चविष्ट अंडा पराठा

शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (22:57 IST)
अंड्याचे ऑमलेट अनेक वेळा खालले असणार, आज अंड्याचा पराठा बनवण्याची रेसिपी जाणून घेऊ या. 
 
साहित्य : 2वाट्या कणीक, 4टेबलस्पून मोयनासाठी तेल ,3-4 अंडी, 1 कांदा बारीक चिरलेला , 4-5 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1/2 चमचा गरम मसाला, मीठ.
 
कृती : अंडी फोडुन फेणून घ्यावीत. कढईत थोड्या तेलावर कांदा परतून घ्यावा. नंतर त्यावर फेणलेली अंडी घालून, मीठ, मिरच्यांचे तुकडे, मसाला घालून हलवावे. अंड्याचे मिश्रण शिजले की गॅस वरून काढून घ्या. कोथिंबीर घालून थंड होऊ द्या. सारण तयार.
 
कणकेत मीठ व तेलाचे मोयन घालून घट्ट मळून घ्या. 1/2 तास पीठ झाकून ठेवावे. नंतर कणकेच्या गोळ्या बनवून लाट्या तयार करून पुर्‍या लाटून घ्या. त्या पुरीवर अंडयाचे मिश्रण थोडे पसरुन सर्व दुरून बंद करून गोल गोळा तयार करा. नंतर तो गोळा पोळी प्रमाणे लाटून घ्या.  नंतर तव्यावर पोळी टाकून दोन्हीकडून शेकून घ्यावी व बाजूने तेल सोडावे.दोन्ही कडून खरपूस शेकून घ्या. अंड्याचा पराठा तयार.गरम पराठा  दह्यासह सर्व करा. 
 
 
 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती