कृती -
सर्वात आधी तांदूळ, उडदाची डाळ आणि मेथी दाणे स्वच्छ धुवून चार तास भिजत ठेवावे. आता हे मिक्सरमधून बारीक काढून घ्यावे व बॅटर बनवून घ्यावे. बॅटर मध्ये थोडे पाणी घालावे. आता हे बॅटर कमीतकमी सहा तास तसेच राहू द्यावे. यानंतर आता यामध्ये मीठ मिक्स करावे. आता एका कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये कांदा घालून परतवून घ्यावे. आता त्यांमध्ये आले लसूण पेस्ट घालून हिरवी मिरची घालून परतवून घ्यावे.तसेच आता त्यामध्ये टोमॅटो घालावे.आता यामध्ये हळद,तिखट,धणेपूड आणि मीठ घालावे. मसाले चांगल्या प्रकारे परतल्यानंतर त्यामध्ये चिकनचे छोटे छोटे तुकडे घालावे. तसेच पाच मिनिट शिजू द्यावे. आता यामध्ये दही घालून चिकन शिजू द्यावे. चिकन शिजल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस घालून कोथिंबीर घालावी. आपला चिकन मसाला तयार झाला आहे. आता तवा गरम करून त्यामध्ये डोसा बॅटर घालून डोसा पसरवून घ्यावा. डोसा तयार झाल्यानंतर, त्यात तयार केलेला चिकन मसाला घाला आणि डोसा घडी करा. तयार डोसा प्लेट मध्ये काढून घ्यावा. तर चला तयार आहे आपला चिकन डोसा रेसिपी. अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.