भारताचा पूर्व भाग नक्षलवाद्यांनी पार पोखरून काढला आहे. नक्षलवादी कारवाया इतक्या वाढल्या आहेत की भारत सरकारचे अस्तित्व तेथे आहे की नाही असा प्रश्न पडतो. आगामी काळात तिथे खलिस्तान किंवा काश्मीरसारखी विघटनवादी चळवळ सुरू झाल्यास आश्चर्य वाटायला नको. पश्चिम बंगालच्या नक्षलबारी येथून सुरू झालेली ही हिंसाचारी चळवळ आता छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओरीसा, बिहार, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर आंध्र प्रदेश या भागात पसरली आहे. ही चळवळ आता देशाच्या शहरी भागात पसरविण्यासाठी पद्दतशीर प्रयत्न केले जात आहेत.
आकडेवारीत घुसल्यास नक्षलवाद किती फोफावला आहे ते स्पष्ट होते. सध्या देशाच्या १९ ट्कके जंगल भूमी नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहे. इथे वेगवेगळ्या नक्षलवादी संघटना तळ ठोकून बसल्या आहेत. पण या संघटनांमध्येही ऐक्य नाही. त्यामुळे देशात सध्या तब्बल २७ नक्षलवादी संघटना कार्यरत आहेत. जगभरात देशांतर्गत सर्वांधिक दहशतवादी संघटना आपल्याच देशात आहेत.
आता लक्ष्य दिल्ली आदिवासी आणि ग्रामीण बहुल भागाबरोबरच देशातील १३ राज्यातील २३१ जिल्ह्यात नक्षली पसरले आहेत. अगदी दिल्लीतील तीन जिल्हयातही त्यांचे धागेदोरे हाती लागले आहेत. यापैकी १७० जिल्हे नक्षलवाद्यांचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात. ते दंडकारण्य भागातील आहेत. छत्तीसगडमधील बस्तरच्या दक्षिणेला असलेला भाग पूर्ण नक्षल्यांच्या ताब्यात आहे. तेथील चिंतेनर ही त्यांची राजधानी मानली जाते.
पूर्वेकडील हे दाट जंगलांचे आणि डोंगराळ प्रदेश सोडून नक्षलवादी आता शहरी भागात हातपाय पसरण्याच्या बेतात आहेत. दिल्ली, मुंबई, पुणे यासारखी शहरे लक्ष्य करण्याचे त्यांनी ठरवले आहे. पण राजधानी दिल्लीवर कब्जा मिळविणे हे आता त्यांचे अंतिम ध्येय आहे. त्यासाठी २०५० ही डेडलाईन आहे. त्या दृष्टिने त्यांनी हातपाय पसरायलाही सुरवात केले आहेत. शासन व्यवस्था खिळखिळी करून आपले शासन प्रस्थापित करणे हा आता त्यांचा मुख्य अजेंडा आहे.
बदलती शस्त्रे शहरांमध्ये शिरकाव करताना नक्षलवाद्यांनी त्यांची अस्त्रे बदलली आहेत. बुद्धिजीवी मंडळींना हाती धरून त्यांच्या मार्फत कायदेमंडळात शिरणे, सामाजिक कार्यकर्त्यांच्या, पत्रकारांच्या माध्यमातून चौथ्या स्तंभात आपली भूमिका स्पष्ट करणे, मानवी हक्क समित्यांच्या मार्फत आदिवासी भागातील अत्याचार लावून धरणे, न्यायसंस्थांवर प्रभाव टाकणे, दलित, महिला आणि युवा संघटनांमध्ये आपल्याविषयी सहानुभूती निर्माण करणे हे उद्योग आता नक्षलवाद्यांनी हाती घेतले आहेत.
पण याही पुढे जाण्याचे त्यांचे इरादे आहेत. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची (माओवादी) काही कागदपत्रे जप्त करण्यात आली. तीत एक गुप्तचर संघटना चालविण्याची गरज प्रतिपादीत करण्यात आली होती. शिवाय शहरी भागात वर्चस्व असणार्या दहशतवादी गटांशी हातमिळवणी करून 'मानसिक युद्ध' सुरू करण्याचे इरादे त्यात नोंदवले गेल्याचे आढळले.
आर्थिक स्त्रोतांवर वार शहरी भागात हातपाय पसरण्यासाठी आर्थिक ताकद हातात यावी यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. स्पेशल इकॉनॉमिक झोन हे त्यांचे आता लक्ष्य आहे. अनेक औद्योगिक वसाहतीत त्यांनी आता शिरकाव करायला सुरवात केली आहे. यातून पैसा मिळविणे आणि दहशत निर्माण करणे हे उद्देश साध्य केले जात आहे. जानेवारी ते जून २००९ या काळात त्यांनी ५६ आर्थिक महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले चढवले. २००६, ०७ आणि ०८ मध्ये ही संख्या अनुक्रमे ७१, ८० आणि १०९ इतकी वाढली आहे.
छत्तीसगडला मोठा फटका देशभरात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात एकट्या २००९ मध्ये २५५ लोक मारले गेले. त्यात २५५ नागरिक आणि २०० पोलिस आहेत. ही गृहखात्याने दिलेली आकडेवारी आहे. छत्तीसगड आणि झारखंड या दोन राज्यांत नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव आहे. त्यातही छत्तीसगडची अवस्था फारच वाईट आहे. २००८ मध्ये देशातील नक्षल्यांनी केलेल्या हिंसाचारात मृत पावलेल्या ७२१ जणांपैकी २४२ छत्तीसगडमधील होते.