नक्षलवाद्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळत आहे. ही मदत कोणत्या माध्यमातून केली जाते हे अद्याप अस्पष्ट असले तरी नक्षलवादी बनण्यासाठी आदिवासी युवकांना तीन हजारांचे आमिष दाखवले जात आहे. अर्थात नक्षलवादी तीन हजारात तरुणांना नोकरीवर ठेवत आहेत.
नक्षल प्रभावित राज्यांमध्ये अशा प्रकारची छुपी भरती केली जात असून, तीन हजारांसाठी तरुण मोठ्या प्रमाणावर नक्षलवादाकडे वळत आहेत.
गृहमंत्रालयानेही अशा प्रकारच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आदीवासींमध्ये शिक्षण जागृती नसल्याने आणि त्यांच्या गरीबीमुळे नक्षली नेते त्यांना आपल्याकडे खेचत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
खंडणी मागण्यासाठीही नक्षलवादी बनलेल्या तरुणांना पाठवले जात असून, जितकी जास्त खंडणी तितकेच जास्त कमिशन त्यांना मिळत असल्याचे बोलले जात आहे.
देशातील आठ राज्यांतील 34 जिल्हे नक्षल प्रभावित मानले जातात. या राज्यांमध्ये सरकारने आता नक्षल विरोधी अभियान सुरू केले आहे.