साध्या गप्पा मारायची पण सोय राहिलेली नाही हल्ली ...

मंगळवार, 25 जानेवारी 2022 (13:59 IST)
आज सकाळी सकाळी लवकर उठून गॅलरीत बसलो...
रोज सकाळपासूनच न भिता दिवसभर चिमण्यांचा मुक्त संचार सुरूच असतो...
आजही चिमणा चिमणी जोडी सकाळीच हजर झाले...
चिमणा टाकलेले दाणे टिपण्यात दंग होता...
तर चिमणी कुंडीतील मिळालेली एक छोटी काडी चोचीत धरून सारखी चिवचिवत होती...
तिच्या भाषेत काय बोलत असावी काय कळत नव्हतं...
मी विचारच करत होतो चिमणी  नक्की काय बोलत असावी बरं....

तेवढ्यात बायको चहा घेऊन आली...
मी बायकोला विचारले, "अगं, ती चिमणी चोचीत काडी धरून चिमण्याशी काय बोलत असेल बरं..."
बायको म्हणाली, "अहो, ती चिमणी काडी चोचीत धरून म्हणतेय की चिमण्या, तू घरात काडीचं काम करत नाही..."
अशाप्रकारे ती चहा ठेवून किचनमध्ये निघून गेली...
साध्या गप्पा मारायची पण सोय राहिलेली नाही हल्ली ...

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती