माणूस एकटा जीवन जगू शकत नाही. त्याला नेहमीच कोणाची तरी साथ हवी असते. पुरुषाला भावनात्मक साथ हवी असेल तर तो स्त्रीचाच विचार करतो. पण कधी-कधी मुली पुरूषाचा हळवेपणा हाच एक कच्चा दुवा समजून त्याचा 'वापर' करून घेतात.
अशावेळी नात्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. म्हणूनच कधीही आपल्या कुटुंबापेक्षा आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला महत्त्व देऊ नये. कुटुंबाकडे लक्ष देत नाही, अशा पुरूष किंवा स्त्रीकडे त्याचा जोडीदार हीन नजरेनेच पहातो.
आपल्या मित्रांच्या गोष्टी फक्त ऐका. त्या अमलात आणायलाच हव्यात असे नाही. कारण त्याच्या आणि तुमच्या परिस्थितीत फरक असू शकतो. आपल्या कुटुंबाकडे नीट बघा. त्यातील समस्या नीट जाणून घ्या. दुसर्याच्या चष्म्यातून आपल्या कुटुंबाकडे पाहू नका. अन्यथा वाद निर्माण होऊ शकतात.
आई-वडील व प्रेमप्रकरण परस्परांआड आले तर वाद निर्माण होतो. अशावेळी पुरुषांनी मध्यस्थीत पुढाकार घ्यावा.