कसं सांगू तिला

WD
आजच्या काळाची गरज, नव्या युगात वावरण्याचा आत्मविश्वास असा आकर्षक मथळ्यांमुळे कोण मोहीत होणार नाही? यात वास्तवही तेवढच आहे. अनिच्छा, खुप विचार, पुढे काय? घेतला प्रवेश. अभ्यासक्रम सुरू झाला. आधी कॉम्प्यूटरवर काम करताना जी भीती वाटत होती ती नाहीसी झाली. दररोज एक नवीन गोष्ट जाणून घेतल्यामुळे होणारा आनंद अवर्णनीय. रोजचा वर्ग नियमित न चुकता करायचो. असं सर्व असतना अनिच्‍छा जी होती ती कायमच.

तो दिवस, वर्गातील प्रवेश आणि ते शब्द, स्वत:ला विसरतो. ते शब्द कायमचे अंतरंगात ठसले. म्हणता ना प्रेम कराव लागत नाही. ते हो असते. कुठेतरी मन गुंतते तेव्हा....

मनातील गोष्टी कागदावर मांडणं सोपं असतं. अभ्यासक्रम दुय्यम वाटायचा, परंतु एका अर्थानी त्यांचं ही मोलाच योगदान म्हणावं लागेल. अभ्यासप्रम संपणार. परीक्षा सुरू होणार. आभाळ कोसळल्यागत झालं.

रात्री पक्का विचार व्हायचा, उद्या सर्व सांगून टाकाव, पण कसं सांगणार? जीव कावराबारला व्हायचा. जड पावलांनी परताव लागत होतं. एकच प्रश्न. कसं सांगू तिला? होती संधी एक, पण काय करणार? हरलो. सहल जाणार होती. सुरुवातीला कळल्यावर खुप आनंद झाला. तिचं आनंदी होणं स्वाभाविकच, पण नाही सांगता आलं.

परीक्षेपूर्वीचे दिवसं नकोसे झाले होते. मन जळत होते. किती सोपं असतं कागदावर मांडण? पण प्रश्न कायमच. सांगू तिला? पानावलेल्या डोळ्यांनी मनाशी खंत केली.. आसवांचा भार आम्हीच का झेलायचा? किचींत हसून मन म्हणाले स्वप्न कुणी पाहील होती? एवढ नक्की की हृदयात स्थान सर्वानाच मिळत नाही आणि ज्यांना मिळाल, ती शेवटच्या श्वासापर्यंत कायम स्थान करून राहतात.

वेबदुनिया वर वाचा