Relationship Tips : मुलांनी जबाबदारीने वागले पाहिजे, म्हणून प्रत्येक पालकाने या चार गोष्टी केल्या पाहिजेत

शनिवार, 8 जानेवारी 2022 (22:11 IST)
प्रत्येक पालकाला आपल्या मुलांवर प्रेम असते पण फक्त मुलांवर प्रेम केल्याने त्यांचे भविष्य चांगले होत नाही. चांगल्या भविष्यासाठी पालक आपल्या मुलांना चांगल्या शाळेत पाठवतात. मुलांना चांगले शिक्षण देतात, पण कठीण परिस्थितीशी लढण्याचे कौशल्य त्यांना शाळेत शिकायला मिळत नाही. पुस्तकी ज्ञानाशिवाय पालकच मुलांना जबाबदारीचा धडा घरी शिकवू शकतात. फक्त पालकच त्यांना लहानपणापासून प्रत्येक संकटासाठी तयार करू शकतात. यासाठी पालकांनी लहानपणापासूनच अशा सवयी मुलांमध्ये रुजवाव्यात जेणेकरून ते बाहेरच्या जगात वावरताना, कोणत्याही अडचणीत सापडल्यावर तर त्यांना धीराने तोंड देता येईल. लहानपणापासूनच मुलांना जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे. याद्वारे तो चांगल्या आणि वाईट सवयींमध्ये फरक करण्यास शिकेल आणि चुकीच्या मार्गावर जाणार नाही. लहानपणापासून मुलांना जबाबदार बनवण्यासाठी पालकांनी या चार गोष्टी करायला हव्यात. 
1  शिस्तबद्धता -मुले किंवा मोठ्यांना , शिस्तलागणे जीवनात आवश्यक आहे. त्यांना लहानपणापासूनच शिस्तबद्ध व्हायला शिकवा जेणेकरून ते मोठे झाल्यावर चांगले आणि निरोगी जीवन जगू शकतील. रोज सकाळी वेळेवर उठून मग दिवसभराच्या कामाचे वेळापत्रक तयार करा आणि मुलांना ती सर्व कामे वेळेवर पूर्ण करायला शिकवा. यावरून मुलांना वेळ आणि प्रत्येक गोष्टीची किंमत कळते.
 
2 घरातील कामात मदत करणे-अनेकदा पालकांना असे वाटते की मुलांनी अभ्यासात पूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे, यासाठी ते त्यांना कोणतेही काम करण्यास सांगत नाहीत. पण असे करू नका. मुलांना घरातील कामात मदत करायला सांगा. त्याला घरची कामेही शिकवा. मुलगा असो वा मुलगी, दोघांनाही घर कसे स्वच्छ करायचे, स्वतःची खोली आणि वस्तू कशा व्यवस्थित करायच्या हे माहित असले पाहिजे. मुले नेहमीच तुमच्यासोबत नसतात. मोठे झाल्यावर त्यांना अभ्यास किंवा नोकरीसाठी तुमच्यापासून दूर जावे लागेल. अशा परिस्थितीत त्यांना घराबाहेरील या कामांमध्ये संघर्ष करावा लागणार नाही.
 
3 वेळेची किंमत -.चांगल्या भविष्यासाठी वेळेची किंमत असणे महत्त्वाचे आहे. मुलांनी सर्व कामे योग्य वेळी केली पाहिजेत, यासाठी त्यांना घड्याळ बघता आली  पाहिजे. मुलांना घड्याळ बघायला शिकवा आणि वेळेनुसारकाम करायलाही शिकवा.
 
4 योग्य आणि अयोग्य ओळखणे- पालकांनी आपल्या मुलाला योग्य आणि अयोग्य ओळखण्यास शिकवले पाहिजे. काय चूक आणि काय बरोबर आहे. चुकीचे काय परिणाम होऊ शकतात, हे सर्व मुलांना अगोदर कळले तर ते जाणूनबुजून किंवा नकळत चुकीचे काम करणे टाळतील.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती