प्रेमाच्या गावाला गेल्यानंतर काही गोष्टींची फार काळजी घ्यावी लागते. प्रेमी युगलांनी एकांतवास कुठे शोधावा हे नीट ठरविणे गरजेचे आहे. मध्यंतरी पुण्यात सांगवी या गावाजवळ लष्करी वसाहतीच्या आसपास प्रेमी युगलापैकी असलेल्या मुलीवर लष्करी जवानांनीच बलात्कार केला. अशा घटना पहाता प्रेमी जोडप्यांनी भेटण्याच्या बाबतीत काही काळजी घेणे गरजेचे आहे. एकांत जरूर अनुभवा, पण तो सुरक्षित असणे गरजेचे आहे. अन्यथा, दोघांची सुरक्षितता धोक्यात घालून एकांत उपभोगणे जन्माचे अद्दल घडविणारे ठरू शकते.