लग्न झालेल्या जोडप्यांसाठी सीक्रेट टिप्स

लग्नाअगोदर आम्हाला बर्‍याच गोष्टींची शिकवण केली जाते जसे असं करा, असं करू नका इत्यादी. याने प्रेमतर वाढतच पण भांडण देखील होतात.   
 
पण तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन सुखद ठेवायचे असेल तर कुठल्याही नियमांमध्ये अडकून राहण्याची गरज नाही आहे बलकी काही  साधारण गोष्टींकडे लक्ष्य देऊन तुम्ही तुमचे वैवाहिक जीन सुखी करू शकता.  
प्रत्येक दिवस नवीन असणे हे गरजेचे नाही : जर तुम्हाला तुमच्या नात्यात मधुरता आणायची असेल तर रोज एखादी भेटवस्तू किंवा प्रेम दर्शवण्याची गरज नसते पण नात्यात शिथिलता येऊ देऊ नका. प्रत्येक दिवसाला एक्‍साईटिंग बनवा. पार्टनरसोबत प्रत्येक दिवशी काही नवीन शेअर करा आणि त्याला हे अनुभव होऊ द्या की तो तुमच्यासाठी किती स्पेशल आहे.
घटस्फोटासाठी भांडण नको : नवरा बायकोमध्ये बर्‍याच वेळा वेग वेगळ्या मुद्द्यांवर वाद विवाद होतात, पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही तलाकच घेऊन घ्या. दोन समजदार लोक आपसात सामंजस्य ठेवून समस्यांचे समाधान काढू शकतात. तुम्ही त्याच्या गोष्टी ऐका आणि त्याच्यासमोर आपली बाजू मांडा.
एकत्र सुट्या घालवा : एका नात्यात बांधल्यानंतर प्रेमासोबत एडवेंचरपण गरजेचे असते. म्हणून एकत्र हॉलिडेवर जा, मस्ती करा आणि  एक-मेकसोबत प्रायवेट वेळ घालवा. याने नात्यात मधुरता येते.
एक सारख्या सवयी : दोन वेगळे वेगळे लोक असतील तर त्यांच्या सवयी देखील वेग वेगळ्या असतात. अशात तुमच्या सवयींना आपल्या जोडीदारा सारखे बनवणे पण योग्य नाही. तुम्ही दोघेही जसे आहे तसेच राहा आणि एक मेकनं तसेच प्रेम करा.  
 
रागाने बिस्तरावर जाऊ नका : नेहमी सकारात्मक राहा आणि कधीही बिस्तरावर जाताना मनात तणाव किंवा राग ठेवू नका. जे काही असेल त्याचे लवकरच निदान लावा. याने प्रेमात वाढ नक्कीच होईल आणि तुमचे जीवन सुखमय राहील.  

वेबदुनिया वर वाचा