विस्टन चर्चिल कॅलेमाईला पत्र

23 जानेवारी, 1935



माझी प्राणप्रिय कॅलेमाई,


ND
मद्रासहून आलेल्या तुझ्य पत्रातून मी तुझे जीवन धन्य केल्याचे तू म्हणालीस, हे वाचून खूप बरे वाटले. या तुझ्या पत्राने मला अत्यानंद झाला. खरोखरच तुझे प्रेम मिळाल्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो. जर प्रेमाचे असे कुठले खाते असते... तर माझे संपूर्ण जीवन तुझ्या हृदयात घालवायला मला आवडले असते. बस्स... मी आणि तू... केवळ तुझी साथ असावी कुणीही काहीही न बोलता केवळ एकमेकांच्या जवळ एकमेकांच्या मिठीत संपूर्ण आयुष्य असेच घालवावे.

काळ हा खूप मोठा जादुगार आहे. तो कुणासाठीही थांबत नाही. तो हातातून एखाद्या वाळू सारखा निसटून गेला. मात्र काळाच्या प्रवाहात आपण किती धन गोळा केले आणि किती संकटांचा व वादळांचा सामना केला हा हिशेब आता करणे कठीण आहे. काळाच्या या ओघात अनेक त्रासदायक वर्षेही आपल्याला घालवावी लागली आहेत. हे विसरून कसे चालेल प्रिये.


तुझाच,

(विस्टन चर्चिल)