हिवाळ्यात पराठे खाण्याची मजाच वेगळी असते. बटाटा, मुळा, पनीर, मटार, कोबी यांनी भरलेल्या पराठ्यांची मेजवानी या दिवसात असते. ज्याची चव जवळपास सगळ्यांनाच आवडते. पण भरलेले पराठे बनवणे इतकं सोपं नाही. स्त्रिया अनेकदा तक्रार करतात की पराठे भरताना किंवा लाटताना फाटतात. त्यामुळे सर्व साहित्य बाहेर येते.असं होऊ नये या साठी पराठे बनवताना या छोट्या टिप्स फॉलो करा. ज्याच्या मदतीने तुमचा एकही पराठा फाटणार नाही. चला तर मग जाणून घ्या.