घरच्या घरात किशमिश बनवा

मंगळवार, 16 मार्च 2021 (09:30 IST)
उन्हाळ्यात असे बरेच फळ मिळतात. या पैकी एका आहे द्राक्ष. रसाळ आणि चविष्ट असे द्राक्ष चवीला गोड असतात. आपण या पासून घरात किशमिश देखील बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या पद्धत.
 
किशमिश बनविण्यासाठी आपल्याला अर्धा किलो द्राक्ष लागतील आणि 5 कप पाणी लागेल. आपल्या कोणत्या साइज ची किशमिश पाहिजे त्यासाठी द्राक्ष त्या साइज चे आणा. लक्षात ठेवा की द्राक्ष खूप मऊ आणि लुसलुशीत नको. अन्यथा ते पाण्यात फाटतात.द्राक्षाचे देठ काढून टाका नंतर स्वच्छ करून एका मोठ्या पात्रात पाणी घ्या त्यामध्ये द्राक्ष घालून मंद गॅस वर द्राक्ष उकळावं. आता उकळून द्राक्ष फुगून पाण्यावर तरंगतील.आता गॅस बंद करून पाणी गाळून द्राक्ष कोरडे होण्यासाठी  ठेवा. द्राक्ष कोरडे झाले की एका मोठ्या परातीत घालून उन्हात वाळत ठेवा आणि किमान 3 -4 दिवस उन्हात ठेवा अशा प्रकारे किशमिश तयार.    
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती