आजकाल प्रेशर कुकर हा स्वयंपाकघराचा एक प्रमुख भाग बनला आहे. स्वयंपाकघरातील या उपकरणामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते. तथापि, प्रेशर कुकर काही कालावधीत घाण होतात. त्याच्यावर डाग पडतात. त्यामुळे प्रेशर कुकर घाण दिसतो. प्रेशर कुकरचे घाणेरडे डाग स्वच्छ करण्यासाठी या टिप्स अवलंबवा.
अनेकदा स्वयंपाक करताना कुकर जळतो. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, कुकरमध्ये खोलीच्या समान तापमानाचे पाणी भरा आणि काही मिनिटे मंद आचेवर ठेवा. त्यात बेकिंग सोडा किंवा लिंबाचा रस घालू शकता. पाण्याला उकळी आली की गॅस बंद करा. आता पाणी थंड होऊ द्या. पाणी थंड झाल्यावर डिशवॉशिंग लिक्विडने कुकर स्वच्छ करा.