मीठ जास्त झाल्यास... 5 सोपे उपाय

जेवण्यात मीठ योग्य प्रमाण असल्यास जेवण्याचा स्वाद वाढून जातो तसेच मीठ जास्त झाल्यास पदार्थ खाण्यायोग्य उरत नाही. अर्थातच जेवणात मीठ आवश्यक आहे आणि तेही योग्य प्रमाणात. भाजी किंवा वरणातील खारटपणा कमी केला जाऊ शकतं या सोप्यारीत्या:
 
बटाटा
भाजी किंवा वरणात मीठ जास्त झाल्यास बटाटा सोलून त्यात घालावा. काही वेळासाठी बटाटा त्यात राहू द्या. नंतर काढून टाकावा.
 
कणीक
भाजीत मीठ जास्त असल्यास भिजलेल्या कणकेची मोठी लाटी तयार करावी आणि भाजीत सोडावी. नंतर लाटी काढून घ्यावी.
 
दही
खारटपणा कमी करण्यासाठी पदार्थात दही मिसळू शकता.
 
लिंबाचा रस
वरणात मीठ जास्त झाल्यास लिंबाचा रस मिसळल्याने काही प्रमाणात तरी खारटपणा कमी केला जाऊ शकतो.
 
ब्रेड
खारटपणा दूर करण्यासाठी ब्रेडदेखील उपयोगी राहील. एक-दोन ब्रेडचे स्लाइस टाकून थोड्या वेळाने काढून घ्यावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती