हिरवी मिरची लवकर खराब होते का? या ट्रिक अवलंबवा

सोमवार, 14 ऑक्टोबर 2024 (16:47 IST)
हिरवी मिरची आपल्या तिखट चवीसाठी ओळखली जाते. पण मिरची लवकर देखील खराब होते. अश्यावेळेस अनेकांना प्रश्न  पडतो की, काय केल्यास आपली हिरवी मिरची खराब होणार नाही. याकरिताच आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ते केल्यास तुम्ही महिनाभर हिरवी मिरची नक्कीच स्टोर करू शकाल. 
 
मिरची फ्रीज करावी- 
याकरिता मिरची स्वच्छ धुवून वाळवून घ्यावी. तसेच देठ काढून मधून कापून घ्यावी किंवा मध्ये चीर द्यावी. तसेच मिरची जिपलॉक बॅगेमध्ये ठेऊन बॅग सील्ड करावी. तसेच अनेक वेळांपर्यंत मिरची चांगली राहते. 
 
हिरव्या मिरचीची पेस्ट बनवा-
मिरची स्वच्छ धुवून घ्यावी आणि पेपर टॉवेल वापरून तिला वाळवून घ्यावे. आता ब्लेंडरमध्ये मिरची, मीठ आणि थोडे गरम तेल घालून बारीक वाटून घ्या. ही पेस्ट हवाबंद बरणीत ठेवावी. तसेच रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि तुम्ही ही पेस्ट 2 महिन्यांपर्यंत सहजपणे साठवू शकता.  
 
तेलात साठवणे-
मिरच्या स्वच्छ धुवून वाळवून घ्या आणि नंतर मधून चिरून घ्या व प्लेटमध्ये ठेऊन द्य. आता कढईत तेल गरम करावे व मिरची घाला आणि मऊ होइसपर्यंत शिजवून घ्या. आता हे मिश्रण थंड होऊ द्या आणि हवाबंद बरणीत घालावे. व रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे. तेल जास्त काळ मिरची टिकवून ठेवण्यास मदत करते तसेच त्यांची मसालेदार चव शोषून  तुम्ही मिरच्या तेलात मीठ टाकून देखील साठवू शकता.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती