कुत्र्याची हुशारी

एकदा एक कुत्रा जंगलात रस्ता विसरून गेला. त्याने पाहिले की समोरहून एक वाघ त्याच्याकडे येत आहे. कुत्रा घाबरू लागला आणि विचार करून लागला की अता माझा शेवटचा क्षण जवळ आला. तेवढ्यात त्याला
बाजूला वाळलेली हाडे दिसली. तो समोरहून येत असलेल्या वाघाकडे पाठ करून बसून गेला आणि एक वाळकं हाड चोखत जोर-जोराने बोलू लागला, 'वाह वाघ खाण्याचा मजा काही वेगळाच आहे. एक अजून मिळाला असता तर पोट भरून गेलं असतं' असे म्हणून त्याने जोरात ढेकर दिला. हे ऐकून वाघ घाबरला. त्यांनी विचार केला की हा कुत्रा तर वाघाचा शिकार करतो. येथून आपले प्राण वाचवून पलायन करणेच योग्य ठरेल आणि तो वाघ तेथून पळत सुटतो.
 
झाडावर बसलेला माकड हे सगळं बघत असतो. तो विचार करतो की ही चांगली संधी आहे, मी आता वाघाकडे जातो आणि या कुत्र्याची हुशारी उघडतो. अशाने मी वाघाचा मित्र होईन आणि जीवनभर वाघापासून माझ्या जीवाचा धोकाही टळेल. असा विचार करून तो वाघाचा मागे जातो.
कुत्रा माकडाला जाताना बघतो की समजून जातो की हा काही तरी लबाडी करणार. तिकडे माकड वाघाला जाऊन सांगतो की कसं कुत्र्याने त्याला मूर्ख बनविले. हे ऐकून वाघ संतापतो आणि गर्जना करत म्हणतो, 'चल माझ्यासोबत, आता त्याला संपवतो.' माकडाला आपल्या पाठीवर बसवून वाघ कुत्र्याकडे धाव घेतो.
 
वाघाला माकडासोबत येताना बघून कुत्रा पुन्हा त्याकडे पाठ करून बसून जातो आणि जोरात म्हणतो, ' या माकडाला पाठवून तासभर होऊन गेला पण हा अजून वाघा घेऊन आला नाही.' हे ऐकताक्षणी माकड तिथून पळून जातो आणि वाघही पुन्हा घाबरून पळत सुटतो. आणि आपल्या हुशारीने कुत्रा आपला जीव वाचवतो.

वेबदुनिया वर वाचा