कंजूष जमीदार आणि हुशार श्याम

मंगळवार, 12 जानेवारी 2021 (10:23 IST)
एका गावात एक जमीदार राहत होता. तो फार कंजूष होता. त्याच्या शेतात जो कोणी काम करायचा तो काम सोडून पळून जायचा. कारण हा जमीदार त्या माणसाला जमीन नांगरणे, बियाणे पेरणे, पाणी देणे या सर्व कामासाठी तर पोटभर जेवायला देत होता. पण पीक कापल्यावर तो जेवायला देत नसे. 
 
साऱ्या गावात त्या कंजूष जमीदारच्या अशा स्वभावा बद्दल बोलायचे. एक काळ असा आला की त्या जमीदाराला शेतात काम करायला एक ही माणूस मिळेना. ज्याला कामावर ठेवण्याचा विचार करायचा तो दुपटीने पैसे मागायचा. 
 
त्याच गावात श्याम नावाचा एक हुशार मुलगा राहत होता. त्याने त्या कंजूष जमीदारा बद्दल खूप ऐकले होते, श्याम ने त्या जमीदाराला अद्दल घडविण्याचा विचार केला. तो एके दिवशी एका माणसाला घेऊन त्या जमीदाराकडे गेला. जमीदाराने त्याला बसण्यास सांगितले आणि येण्याचे कारण विचारले. श्याम म्हणाला की त्याला शेतात काम करण्याची इच्छा आहे आणि आपण कामावर ठेवाल अशा आशेने आलेला आहे. 
 
जमीदार म्हणाला की 'तुला वर्षभर काम करावे लागेल. मधून काम सोडून पळून तर जाणार नाही?' 
'ठीक आहे किती देणार आधी हे सांगा मगच मी उत्तर देतो 'असं श्याम म्हणाला.'
 
हे तर मी तुझे काम बघूनच ठरवेन जर तू चांगले काम केले तर वर्षांचे तुला बारा किलो तांदूळ देईन. जर काम चांगले केले नाही तर नऊ -दहा किलो देईन. कपडे देखील देईन. 'जमीदार म्हणाला.
 
त्याचे म्हणणे ऐकून श्याम म्हणाला - 'आता माझी देखील अट ऐकून घ्या. मला हे माहित आहे की आपण मजुरांना कमी खाणं आणि कमी मजुरी देता म्हणून ते काम सोडून जातात. आपण वर्षातून मला एक बियाणे धान्याचे द्या जे मी स्वतः जमिनीखाली पेरेन एक बियाणे गव्हाचे द्या ज्याला मी उंच जमिनीवर लावेन, घालायला कापडे द्या. दररोज एक पत्रावळी भात खाण्यासाठी द्या. एका पत्रावळीपेक्षा अधिक मागणार नाही. या नंतर पण मी काम केले नाही तर आपण माझे हात कापून टाका. पण या अट विरुद्ध आपण काम केले तर मी आपले हात कापेन, आपल्याला माझी अट मान्य आहे का ?
 
जमीदाराला काहीच हरकत नव्हती, त्याने श्यामची अट मान्य केली. श्याम ने मजुरी करण्यास सुरुवात केली. जेव्हा तो जेवायला गेला तेव्हा त्याने एक मोठे केळीचे पान नेले होते. 
 
जमीदाराने एवढे मोठे पान बघून रागावून श्यामला विचारले की तू केळीच्या पानात जेवणार आहेस? 
 
पण मालक अट आहे ना श्याम म्हणाला. होय अट अशीच होती. जमीदाराने उत्तर दिले. नंतर श्यामला केळीच्या पानात जेवायला दिले. श्याम दररोज केळीच्या पानातच जेवायचा. आचारीने देखील जमीदाराला सांगितले की मालक ह्या माणसामुळे भात शिजवून दमायला झाले हा एकटा 10 माणसांचा भात खातो कुठून आणले ह्याला.
 अरे पण हा 10 माणसांचे काम देखील एकटाच करतो जमीदार आचाऱ्याला म्हणाला.गोष्ट पण खरी होती की श्याम आपले सर्व काम मन लावून करीत असे. 
 
मजुरी म्हणून एक बियाणं गव्हाचं घेत होता. त्याने आपल्या मालकाला म्हटले -' मालक मी या शेणाच्या खाली गहू पेरले आहे.' धान्य जमिनीच्या खाली पेरले आहे. काही दिवसानंतर गव्हाच्या रोप्यातून बरीच धान्ये बाहेर आली आणि अशाच प्रकारे भाताच्या धान्यातून देखील बरीच धान्ये आली. 
 
श्यामने ते सर्व बियाणे म्हणून ठेवले. दुसऱ्या वर्षी देखील पीक चांगले आले. मजुरी म्हणून त्याला एक एक वेगळे बियाणे मिळाले. अटी प्रमाणे त्याला ते गहू आणि भात धान्य पेरायला खालची आणि वरची जमीन मिळाली. 
 
अशा प्रकारे जमीदाराच्या हातून सर्व जमीन निसटून गेली. श्याम ने खालच्या जमिनीत धान्य किंवा भाताची रोपे लावली आणि वरच्या जमिनीवर गहू पेरले. 
 
शेवटी जमीदाराने पंचांयतकडे श्यामची तक्रार केली. श्याम देखील तिथे हजर झाला. सर्व गावकऱ्यांनी श्यामला समजावले की जमीदाराला माफ कर त्याला त्याच्या केलेल्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे.
 श्याम म्हणाला की 'ह्याने गरिबांना खूपच त्रास दिला आहे. त्यांना जेवायला देखील दिले नाही त्यांच्या कडून काम करवून घेतले ह्यांना शिक्षा मिळायला पाहिजे. 
 
'ह्यांना थोडी जमीन देऊन दे' असे पंच म्हणाले. 'ठीक आहे ह्यांनी आपले हात कापून द्यावे 'श्याम म्हणाला.' नाही मी आपले हात कापणार नाही'. जमीदार म्हणाला.
 
 श्यामने जमीदारावर दया करून त्याला अर्धी जमीन परत दिली. त्या दिवसा पासून जमीदार देखील बदलला आणि तो सर्व मजुरांच्या सह चांगला व्यवहार करू लागला. त्यांना पोटभर जेवायला देत होता आणि योग्य मजुरी देखील द्यायचा. गावाचे लोक श्यामच्या हुशारीचे कौतुक करीत होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती