एकदा एक टोपी विकणारा आपल्या टोप्या विकायला जात होता. वाटेत तो विश्रांती घेण्यासाठी झाड खाली झोपला. थंड वाऱ्याची झुळूक आल्यावर त्याला झोप लागते. त्या झाडा वर माकड असतात. त्या पैकी एक माकड त्याच्या सर्व टोप्या घेऊन झाडावर जाऊन बसतो आणि सगळे माकड त्याची टोपी घालून घेतात.टोप्या विकणारा उठून बघतो तर सगळ्या माकडाने त्याच्या सर्व टोप्या घातल्या आहे. तो त्यांना मारायला दगड उचलतो तर माकडे देखील त्याचे अनुकरण करतात. त्याला लक्षात येत की हे माकड जसं तो करत आहे तसेच करत आहे. म्हणून त्याला एक युक्ती सुचते की तो आपल्या डोक्या वरील टोपी काढून जमिनीवर फेकतो.माकडे देखील तसेच करतात आणि आप आपल्या टोप्या काढून खाली फेकतात. टोपी विकणारा आपल्या सगळ्या टोप्या गोळ्या करून पुढे वाढतो अशा प्रकारे तो आपल्या टोप्या मिळवतो.