Gautam Buddha Story : मारणार्‍यापेक्षा तारणार्‍याचा अधिकार

शनिवार, 16 जुलै 2022 (13:21 IST)
एके दिवशी राजकुमार सिद्धार्थ त्यांच्या चुलत भाऊ देवदत्तसोबत बागेत फिरायला गेले. सिद्धार्थ हे कोमल मनाचे होते, तर देवदत्त भांडखोर आणि कठोर स्वभावाचे होते. सिद्धार्थचे सर्व कौतुक करायचे. देवदत्ताची स्तुती कोणीही करत नसे. त्यामुळे देवदत्तच्या मनात सिद्धार्थाचा हेवा वाटत होता.
 
त्यांच्यापासून थोड्या अंतरावर एक हंस उडत होता. त्या हंसाला पाहून सिद्धार्थ यांना खूप आनंद झाला. तेव्हा देवदत्तने बाण सोडला आणि तो सरळ जाऊन राजहंसाला लागला. तो जखमी होऊन बेभान होऊन खाली पडला.
 
सिद्धार्थने धावत जाऊन जखमी हंसाला उचलले. राजहंसाच्या जखमी शरीरातून वाहणारे रक्त त्यांनी स्वच्छ केले. आणि त्याला पाणी पाजले, तेवढ्यात देवदत्त तिथे पोहोचला. त्याने सिद्धार्थकडे रागाने पाहिलं आणि म्हणाला - शांतपणे हा हंस माझ्याकडे दे, माझ्या बाणाने तो पाडला आहे. 
 
नाही! सिद्धार्थ यांनी राजहंसाच्या पाठीवर हात फिरवत उत्तर दिले - हा हंस मी तुला देऊ शकत नाही. 
तू निर्दयी आहेस, तू या निष्पाप हंसावर बाण मारला आहेस. मी वाचवले नसते तर तो मरण पावला असता.
बघ सिद्धार्थ! देवदत्त त्यांच्याकडे पाहून म्हणाला हा हंस माझा आहे. मी बाणाने त्याला खाली पाडले. शांतपणे मला दे. जर तुम्ही तसे केले नाही तर मी राजदरबारात जाऊन तुमच्याबद्दल तक्रार करेन.

सिद्धार्थ यांनी त्याच्याकडे हसून स्पष्टपणे नकार दिला. देवदत्त राजा शुद्धोदनाच्या दरबारात पोहोचला आणि सिद्धार्थबद्दल तक्रार केली. शुद्धोदनाने त्याची तक्रार काळजीपूर्वक ऐकली आणि मग सिद्धार्थ यांना बोलावले. काही वेळातच सिद्धार्थ हंससोबत राजदरबारात हजर झाले. राजा शुद्धोदन राजदरबाराच्या उच्च सिंहासनावर बसले होते.
 
दाराजवळ अनेक सैनिक शस्त्रे घेऊन उभे होते. शुद्धोदनाच्या संकेतावर देवदत्ताने मस्तक वाकतव सांगितले की महाराज ! यावेळी सिद्धार्थसोबत असलेला हंस माझा आहे, मी तो बाण मारून पाडला आहे. सिद्धार्थने त्याला उचलून ताब्यात घेतले. हा हंस माझा आहे, कृपया तो परत देण्याची आज्ञा करावी. 

राजा शुद्धोदनाने सिद्धार्थांकडे पाहिले आणि बोलण्याचा इशारा केला. सिद्धार्थ यांनी शांत स्वरात सांगितले की महाराज ! हा हंस निष्पाप आहे, तो कोणालही त्रास न देता उडत असताना देवदत्तने बाण मारून त्याला जखमी केले. मी त्यावर उपचार केले आहेत. त्याचा जीव वाचला आहे. मी समजतो की जो जीव वाचवतो त्याला जीव घेणाऱ्यापेक्षा जास्त अधिकार आहे. मी तुम्हाला विनंती करतो की हा हंस माझ्याकडे राहू द्या. मला त्याला पूर्णपणे निरोगी बनवायचे आहे आणि ते आकाशात उडवायचे आहे.
 
शुद्धोदनाने आपल्या सदस्यांशी चर्चा केली. ते सर्व एकाच आवाजात म्हणाले, महाराज! राजकुमार सिद्धार्थ अगदी बरोबर आहे. जीव घेणार्‍यापेक्षा वाचवणार्‍याला जास्त अधिकार आहेत. त्यामुळे राजहंस राजकुमार सिद्धार्थाकडे राहू द्यावा. राजा शुद्धोदनाने सभासदांचा सल्ला मान्य केला. त्यांनी सिद्धार्थला म्हटले की या हंसावर तुमचा अधिकार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती