सहलीच्या वेडामध्ये

WD
अध्यापनाच्या सुरांमध्ये शब्द तार्‍यांचे
सहलीच्या वेडामध्ये विचार मुलांचे
मनातल्या प्रश्नांची उकल तेथे होते,
श्रमनिष्ठा कर्तव्याची जाण त्यांना येते
संघशक्तीमुळे त्यांचा बुजरेपणा जाता
मनाच्या भीतीचा स्वच्छंदीपणा होतो
शाळेमुळे बहरते एक नवी सृष्ट
मुलांना अभ्यासाची मिळते अशी नवी दृष्टी
जीवनाला लायक मुले येथे घडती
जगद्‍गुरुच्या सहवासाची आहे अशीच महती.

वेबदुनिया वर वाचा