सोनुल्या

ND
सांग चिमुकल्या सांग मला
काय हवे रे काय तुला....
तु माझ्या अंगणीच्या गुलाबफुला
तु जणु आकाशीच्या चंद्रकला
सांग मला रे सांग मला
काय हवे रे सांग तुला....
सूर्य हवा की चंद्र हवा
हवीच पाटी का पेन हवा
सांग मला रे सांग मला
काय हवे रे सांग तुला...
गाडी हवी का चेंडू हवा
नको रूसुन तु बसु असा
सांग मला रे सांग मला
काय हवे रे काय तुला..।।

वेबदुनिया वर वाचा