बाळाचे सोबती

WD
आली बागेत खारुताई
दिमाख तिचा भारी
दोन पायावर ऐटीत बसली
शेपटी फुलवून स्वारी
WD
जंगलात नाचत होता मोर
काय त्याचा तोरा
काळ्या ढगांना पाहून
फुलविला पिसारा
आला वसंत दारी
WD
कोकिळेला फुटला कंठ
कुहू कुहू साद घाली
भरे आसमंत
WD
चिऊताई आली दारी
टिपू लागली दाणे बाळासाठी
चिवचिवत तिने गायले गाणे....... !

साभार : वार्षिक अनुपुष्प दिवाळी विशेषांक 08

वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा