तुळ राशीच्या जातकांचे 2015मधील वार्षिक राशिभविष्यफल

मंगळवार, 30 डिसेंबर 2014 (13:14 IST)
तुळ राशीच्या लोकांना वर्षभर गुरुचे भ्रमण राशीत व धनस्थानात राहणार आहे. गुरूची ही उच्च रास आहे, त्यामुळे फळंही तसेच मिळतील.  तुळा राशीच्या कुंडलीनुसार या वर्षभरात तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी काहीतरी विशेष करून दाखवणार आहात. तुम्हाला नवी उर्जा मिळाली आहे, असे वाटत आहे. नोकरीमध्ये बढती होण्याची खूप शक्यता आहे. लोकांकडून सहकार्य मिळे आणि तुमच्याविषयी असलेल्या आदर आणि सन्मानात वाढ होईल. शनि दुसऱ्या घरात आल्यामुळे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला खर्च करताना हात थोडासा आखडता घेण्याची गरज आहे. व्यवसायात फेब्रुवारी 2015 पर्यंत प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल कालावधी आहे. तुमच्यातील निराशा दूर करणारे हे ग्रहमान आहे. 
 
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... :  गुरू आणि शनी या दोन ग्रहांची वर्षभार चांगली साथ मिळाल्यामुळे व्यापारीवर्गाचे इरादे बुलंद असतील. मे ते जून 2015 मध्ये कोणतेही करार करू नका. जुलै 2015 पासून पुढील दिवाळीपर्यंत तुमचे यश स्पृहणीय असेल. एप्रिल ते ऑगस्ट परदेशगमन व परदेश व्यवहाराच्या कामांना गती येईल. जोडधंद्यातून विशेष कमाई होईल. नोकरीत प्रगतीच्या दृष्टीने उत्तम वर्ष आहे. कामाच्या नवीन संधी चालून येतील. फेब्रुवारी 2015 मध्ये वरिष्ठांकडून अपेक्षित ठिकाणी बदली होईल, असे आश्वासन मिळेल व मे ते जून 2015 मध्ये बदलीच होईल. काही जणांना संस्थेचे प्रतिनिधित्व देशात किंवा परदेशात करता येईल. मात्र पैशाच जास्त हव्यास धरून वेडेवाकडे बदल करू नका. तसेच जे पैसे मिळतील त्याचा केवळ योग्य कारणाकरिताच उपयोग करा.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...
गृहसौख्य व आरोग्यमान... : तुळा राशींच्या व्यक्तींच्या कौटुंबिक आयुष्याबाबत सांगायचे झाले तर थोडे फार गैरसमज होण्याची शक्यता आहे. असे असले तरी एकोप्याला फार धक्का लागणार नाही. आरोग्याचा विचार करता 2015 साल उत्तम आहे. तुम्ही घर किंवा कार घेण्याचा विचार करत असाल तर आता त्या द्विधा मनस्थितीतून बाहेर पडा. ठोस निर्णय घ्या. घरात गृहसजावट, दुरुस्ती इ. कामे पूर्ण होतील. तरुणांचे विवाह जमतील व पार पडतील. महिलांना मन:शांती मिळेल. गृहिणींची दीर्घकाळची इच्छा पूर्ण होईल. 2015 चा उत्तरार्ध हा तुमच्यासाठी गुलाबी काळ असणार आहे. खासगी बाबतीत तुम्हाला अनेक आनंदाचे क्षण लाभणार आहेत. त्यामुळे या गुलाबी वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी तयार राहा. कलाकार आणि खेळाडूंना पूर्वी विनाकारण अन्याय सहन करावा लागला असेल तर तो दूर झाल्यामुळे नवचैतन्य लाभेल. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष सकारात्मक राहील.
 
शुभ रंग : पांढरा 
शुभरत्न : मोती      
आराध्यदैवत : गणपती       
उपाय: कपाळावर केशरी टिळा लावा.

वेबदुनिया वर वाचा