कन्या राशीच्या जातकांचे 2015मधील वार्षिक राशिभविष्यफल
मंगळवार, 30 डिसेंबर 2014 (13:06 IST)
कन्या राशीच्या लोकांना नवीन वर्षात पदार्पण करताना जूनपर्यंत गुरू लाभस्थानात आहे. तो तुम्हाला तुमच्या व्यवसाय धंदा आणि नोकरीमध्ये वाढ दर्शवितो, पण जुलैनंतर मात्र पुन्हा एकदा खर्च वाढतील. 2015 सालाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये राहू ११ व्या स्थानात असेल. त्यामुळे तुम्हाला बराच फायदा होईल. हा तुमच्यासाठी अनपेक्षित घटनांचा काळ असणार आहे. त्याचप्रमाणे या वर्षातील पहिले सहा महिने प्रेमसंबंध, विवाह आणि मुलांसाठी चांगले असतील. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या दृष्टीनेसुद्धा हा काळ अनुकूल आहे. कन्या राशी भविष्य 2015 अनुसार या वर्षात तुम्हाला खूप संधी मिळणार आहेत आणि जल्लोष करण्यासारखे खूप क्षण येतील. पण या वर्षाच्या उत्तरार्धात मात्र काळजी घेण्याची गरज आहे.
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... : व्यापारीवर्गाला नशिबाची साथ मिळाल्याने तुमचे अनेक अंजाद व आडाखे बरोबर येतील. मे ते जुलै हा कालावधी विशेष चांगला ठरेल. कारखानदार कामाचा विस्तार करतील. जुलैनंतर मात्र मोठी गुंतवणूक केल्यामुळे मिळालेले पैसे अपुरेच वाटतील.
नोकरदार व्यक्तीना पगारवाढ किंवा काही विशेष सवलती देण्याचे वरिष्ठांनी मान्य केले असेल तर जानेवारीत त्याची नांदी होईल. प्रत्यक्ष फायदा फेब्रुवारी, मार्च किंवा मेनंतर मिळेल. काही जणांना विशेष कामगिरीकरिता परदेशी जाता येईल. एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर जुलैनंतर निवड होईल. त्याचा तुम्हाला अभिमान वाटेल. ज्यांना स्वत:चा नवीन व्यवसाय सुरू करावयाचा आहे, त्यांनी नवीन वर्षापासून सुरुवात करावी. बेकार व्यक्तींना नोकरीची संधी दारी येईल.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...
गृहसौख्य व आरोग्यमान... :कौटुंबिक जीवनात तुम्हाला जीवनाचा आनंद घेता येईल. या काळात कुटुंबातील सदस्यांचीसुद्धा भरभराट होणार आहे. पण राहू पहिल्या घरात असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक राहिल. पण यात काळजी करण्यासाठे फार कारण नाही. केवळ सतर्क राहा आणि प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घ्या. एखाद्या जवळच्या नातेवईकाबरोबर दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील, त्यामुळे वातावरणातील बदल तुम्ही अनुभव शकाल. तरुण त्यांच्या कार्यक्षेत्रात विशेष कौशल्य दाखवतील. गृहिणींना आवडते छंद जोपासता येतील. नवीन वास्तूत राहायला जाता येईल. कलाकार व केळाडूंच्या कौशल्याला भरपूर वाव असल्यामुळे ते खूश असतील.