मेष राशीच्या जातकांचे 2014मधील वार्षिक राशिभविष्यफल

WD
नवीन वर्षात तृतीय आणि चतुर्थस्थानातील गुरुचे भ्रमण, शनीचे सप्तमस्थानातील वास्तव्य यामुळे वर्षभर तुम्ही सतर्क राहणार आहात. योग्य वेळी म्हणजे जानेवारीपासून तुमची मुसंडी यशस्वी होईल. अधिकार प्रप्ती होईल. नेतृत्व व पुढारीपण लाभेल. लोकांना उपकृत कराल. मंगळ, गुरू तसेच सप्तमातील शनी व नेपच्यून यांचे भ्रमण शुभ ठरेल. मार्चपासून पुढील दिवाळीपर्यंत कामगारांचे प्रश्न, तांत्रिक अडचणी आणि पुनर्गुतवणूक यात लक्ष घालावे लागेल. पैसे चांगले मिळतील, पण ते शिल्लक राहणार नाहीत. एप्रिल-मे आणि सप्टेंबर-‍ऑक्टोबरमध्ये धोका पत्करू नका.

पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....


धंदा, व्यवसाय व नोकरी

WD

नोकरीमध्ये तुमच्या कौशल्याला मार्चपासून भरपूर वाव मिळेल. महत्त्वाकांक्षी व धाडसी तरुण मंडळींनी आपले बस्तान नीट बसवून घ्यावे. त्यांना व्यवसायाची नवीन दालने खुली होतील. त्याचा त्यांनी फायदा करून घ्यावा. बदली आणि बढतीची शक्यता मार्चपर्यंत आहे.

पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान....


गृहसौख्य व आरोग्यमान

WD

कौटुंबिक सौख्याचा दृष्टीने वर्ष आव्हानाचे आहे. जोडीदाराशी चर्चा आणि विचारविनिमय करून कोणतेही निर्णय घेणे योग्य ठरले. जानेवारी, फेब्रुवारीच्या सुमारास एखादे महत्त्वाचे काम सहज व्हावे. शुभकार्य ठरावे. वास्तूची कल्पना साकार व्हावी. विवाहेच्छू, होतकरू तरुण मंडळींचे शुभमंगल ठरावे. वि‍द्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती मात्र साधारण राहील. जूनपर्यंत मुलांना त्यंच्या आवडत्या क्षेत्रात प्रावीण्य दाखवून एखादे बक्षीस/पारितोषिक पटकावता येईल.

मेष रास ही चर गुणधर्म असलेली. अग्नितत्त्वाची जिचा अधिपती मंगळ आहे व चिन्ह मेंढा आहे. शुभरंभ तांबडा, शुभरत्न पोवळे व आराध्य दैवत गणपती आहे. मेषेत रावी म्हणजे ग्रहांच्या उच्च राशीत समजला जातो.

वेबदुनिया वर वाचा