जर तुमच्या आयुष्यातील कठीण काळ सुरु होणार असेल तर, तुमचे ग्रह तुम्हाला सावध करत असतात. जर तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील तर समजून घ्या तुमच्यावर संकटे येण्यास सुरुवात होणार आहे.
जर तुमच्यावर एखादे संकट येणार असेल तर स्वप्नात तुम्हाला त्याचे संकेत मिळतात. परंतु तुम्हाला ते संकेत समजून घ्यावे लागतील. जर तुम्हाला संकेत समजले तर तुम्ही सावध राहून संकटावर मात करू शकता.
कठीण काळ सुरु होणार असेल तर या घटना स्वप्नात दिसतात...
- स्वप्नामध्ये तुम्हाला काळ्या रंगाचा माणूस दिसेल.
- स्वप्नात सतत जंगल दिसत असेल किंवा तुम्ही स्वतःला जंगलात पाहत असाल तर तुम्हाला पैश्याच्या व्यहारात तोटा होऊ शकतो.
- स्वप्नात एखादे जंगली श्वापद तुमच्यावर हल्ला करत असेल तर तुम्ही मोठ्या संकटात सापडणार आहात.
- स्वप्नात तुम्ही उंच ठिकाणाहून पडत आहात असे तुम्हाला दिसले तर तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला तोटा सहन करावा लागेल.
- स्वप्नात तुम्हाला एखाद्या देवाची दुभंगलेली मूर्ती दिसली तर तुमचा कठीण काळ सुरु होणार आहे.