सुष्मिता सेन :विवाह संभव

IFM
चित्रपट अभिनेत्री सुष्मिता सेनचा जन्म 19 नोव्हेंबर 1975ला वृश्चिक लग्न व वृषभ राशीत झाला होता. राशी स्वामी उच्च नसून एकादश भावात असल्यामुळे ‍सुष्मिताला चित्रपटात फारसे यश मिळाले नाही.

कुठल्याही कलाकाराला यश मिळविण्यासाठी त्याचे ग्रह बर्‍याच वेळा जबाबदार असतात. तसे देखील सुष्मिताने चित्रपट क्षेत्रात फारसा काही यश मिळविला नाही आहे. पंचम (मनोरंजन भाव)चा स्वामी गुरु वक्री आहे. ज्या भावाचा स्वामी वक्री असतो, तो त्याला भावाला कमजोर करतो.

मंगळ, लग्नाचा स्वामी असून अष्टम स्थानात आहे त्यामुळेच परिश्रम केल्यानंतर ही तिला फारसा यश मिळाला नाही. सध्या पंचम (मनोरंजन भाव)चा स्वामी गुरु शुक्राची राशी वृषभामध्ये 30 मे 2013पर्यंत राहणार आहे. हा वेळ विवाहासाठी उपयुक्त ठरेल.

यानंतर मिथुनाहून गोचर भ्रमण करेल. त्याच्यानुसार धनेश व पंचमेश वक्री असून कला क्षेत्रातही फारसे काही यश मिळणार नाही. पत्रिकेत कलानिधी योग बनत आहे आणि याच कारणामुळे तिला थोडे फार चित्रपट मिळाले. एका कलावंताची इच्छा उत्तम यशाची असते पण सुष्मिताला ग्रहांमुळे ते काही मिळाले नाही.

जेव्हा व्यक्तीचे ग्रह योग प्रबळ असतील तेव्हा त्याला यश मिळतं. सुष्मिताच्या पत्रिकेत सुखेश व पराक्रमेश शनीदेखील वक्री आहे. दशम सूर्य लग्नात अग्नी तत्त्वाची राशी वृश्चिकामध्ये असल्यामुळे आजपर्यंत तिला वैवाहिक सुख मिळालेले नाही. नेहमी बघण्यात आले की सूर्य लग्नात असले तर विवाहात अडचणी येतात.

वेबदुनिया वर वाचा