मेष : आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर असामान्य शक्तीची साथ मिळेल. आणि त्याच जोरावर आपले वाजवी ध्येय साध्य करु शकाल. आपल्या जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. आपली मते ठाम ठेवलीत व प्रत्येक पाऊल सावधतेने उचलले़ तर त्याचा आपल्याला त्रास होणार नाही आणि आशेचा नवीन किरण दिसेल. जनसंपर्कातून सतत लाभ होतील. नव्या जोमाने कामाला लागाल. व्यावसायिक करार होतील. शुभदिनांक २६.
वृषभ : उष्णतेचे विकार, संसर्गजन्य विकार यांपासून त्रास होण्याची शक्यता राहाते. विरोधकांचा त्रास जाणवेल. महिला घरातील सुखसोयी वाढविण्याकरीता नवीन खरेदीचे मनसुबे आखतील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. जुने मित्र भेटल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नोकरीच्या शोधात असणार्या तरुणांना सुसंधी लाभतील. . शुभदिनांक २४, २५.
मिथुन : वरिष्ठांच्या आज्ञेनुसार वागलात तर एखादी सवलत निश्चित मिळेल. वैयक्तिक कारणानिमित्त प्रवास घडून येतील. करमणुकींच्या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण होत आहे. सार्वजनिक संबंधाच्या प्रश्नांशी सतत संबंध येतील. त्यातूनच समाजात नांवलौकिक वाढेल. घरातील दुर्लक्षित कामांना वेळ देता येईल. घरातील सुखसुविधा वाढविण्याकडे विशेष लक्ष द्याल. नवीन खरेदीचे बेत आखले जातील. शुभदिनांक २७.
कर्क : नव्या जोमाने कामाला लागाल. उत्साह व उमेद वाढेल. बौद्धीक व कला क्षेत्रातून चांगला फायदा होईल. व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी करत असलेल्या आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. भविष्यकाळाच्यादृष्टीने मोठ्याप्रमाणात आर्थिक तजवीज करणे सहज शक्य होईल. आर्थिक क्षेत्रातील निर्णय योग्य ठरणार आहेत. भावंडांचा एखादा सल्ला लाखमोलाचा ठरेल. कुटुंबातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. शुभदिनांक २६.
सिंह : जुनी थकेलेली येणी वसूल होतील. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. परदेशी संस्थांशी व्यावसायिक करार केले जातील. मन शांत राहिल्याने त्याचा व्यवसायावर चांगला परिणाम होईल. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीतून होणारे चंद्राचे भ्रमण आपल्या वैयक्तीक उत्कर्षास पूरक आहे. रचनात्मक कलाकृतींचा ध्यास घ्याल. नवनिर्मितीचा आनंद घ्याल. आपल्या वक्तृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. शुभदिनांक २२, २३..
कन्या : आपल्या वक्तृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. धाडसी निर्णय घेतले जातील. कामात थोडा बदल केल्याने बरे वाटेल. तुमच्या मनात नवे विचार येतील. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या व्ययस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. आपल्या कार्यक्षेत्रात व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. कार्यक्षेत्रात विविध संधी उपलब्ध होतील. उधारी वसूल होईल. शुभदिनांक २५.
तूळ : काही बाबतीत आपल्याला चांगला दिलासा मिळणार आहे. आपले अंदाज अचूक ठरतील. कौटुंबिक सुखसोयी वाढविण्याकरीता महिला प्रयत्नशील राहतील. समोर आलेल्या संधीचा फायदा घ्या. परदेशस्थ भावंडांशी सुसंवाद साधाल. कार्यक्षेत्रातील प्रशिक्षणाच्या निमित्ताने परदेशी संस्थांशी संबंध येतील. एखादा निर्णय अनपेक्षितपणे झटपट घेतला जाईल व भविष्यात त्याचा उपयोग होईल. जूनी व्यावसायिक येणी वसूल होतील. शुभदिनांक २७.
वृश्चिक : नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. रेंगाळलेली कामे विना सायास मार्गी लागीतल. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे. कर्मस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण तरुणांना नोकरीच्या सुसंधी देणारे राहील. उत्तरार्धात अवाजवी साहस टाळावे. शुभदिनांक २८.
धनु : नवनवीन कल्पना आकार घेतील. आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. हातून सत्कर्म घडेल. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. थोरा-मोठ्यांच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कर्जप्रकरणे मंजूर होतील. शुभदिनांक २२.
मकर : स्वतःचे प्रयत्न स्वतःच करावेत. नवीन कार्यारंभ करण्याचा उत्साह निर्माण होईल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखून काम केलेत तर निश्चीत एखाद्या सवलतीचा लाभ घेता येईल. आपल्या राशीच्या अष्टमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. मात्र अविचाराने कोणतेही निर्णय घेऊ नका. नव्या उमेदीने कामाला लागाल. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. शुभदिनांक २४, २५.
कुंभ : विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. जनसंपर्कातून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील. आत्मविश्वास व मनोबल उत्तम राहील.व्यवसायातील कामाचा वेग वाढेल. भागीदारी व्यवसायातून चांगले उपक्रम राबविता येतील. कामानिमित्त दूरचे प्रवास ठरतील. सरकारी कामात योग्य प्रगती होईल. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. अंधःश्रद्धेला बळी पडू नका. प्रतिस्पध्र्याची चाल पाहूनच पुढे वाटचाल करावी. सार्वजनिक संबंधाच्या प्रश्नांशी सतत संबंध येतील. त्यातूनच समाजात नांवलौकिक वाढेल. शुभदिनांक २३.
मीन : व्यवसायात नवीन योजना राबवू शकाल. अनेक कामातून सफलता मिळणार आहे. व्यवसाय उद्योगात वापरलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपणांस लाभदायक राहील. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. मोठ्या यशासाठी प्रयत्न करावे लागतील. मार्गदर्शन घडेल. कोणताही निर्णय घेताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. शुभदिनांक २५.