सूर्य आणि चंद्राचा लपंडाव सूर्यग्रहणाच्या रुपाने आपणाला चांगलाच परिचीत झालेला आहे. तसाच काहीसा लपंडावाचा प्रकार बुध आणि शुक्र हे दोन ग्रह सूर्याबरोबर खेळत असतात. अर्थात हा लपंडाव दूर्मिळ असतो. सायंकाळच्या वेळेस पश्चिम क्षितीजावर अत्यंत ठळक चांदणीच्या रुपात लक्ष वेधून घेणारा आपल्या सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र 6 जून रोजी सकाळी अवकाशात एक अनोखा नजराना पाहण्याती संधी आपणाला देणार आहे.
भारतीय वेळेनुसनार पहाटे 3 वाजून 40 मिनिटापासून ते सकाळी 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत जवळपास सात तासापर्यंत, सूर्य, शुक्र आणि पृथ्वी यांच्यात हे नाट्य अधिक्रमणाच्या रुपाने रंगणार आहे. संपूर्ण भारतातून दिवसा उजेडी आकाशात दिसणारे हे विलोभनिय दृष्य पाहण्याची संधी मिळणार आहे. 6 जून रोजी शुक्र हा ग्रह सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येणार आहे. त्यामुळे याला शुक्राच अधिक्रमण म्हणतात. शुक्र हा पृथ्वीपासून सरासरी जवळपास 4.5 कोटी किलोमीटर आहे. शुक्र सूर्याला कधीक झाकू शकत नाहीत. शुक्राचा एक काळा ठिपका सूर्याच्या बिंबावरून गेल्याचे जाणवते. अर्थात हे एक प्रकारचे सूर्यग्रहणच आहे.