येणार्या काही दिवसांमध्ये आकाशाच्या पटलावर शुक्र आणि गुरू हे दोन ग्रह एकत्र आल्याचे दिसेल. यावेळी त्यांच्या कक्षांमध्ये सर्वात कमी अंतर असेल. अंतराळात हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून अतिशय दूर अंतरावर आहेत. मात्र ही युती पाहताना ते अतिशय जवळ असल्याचा भास होईल.
सूर्यास्तानंतर लगेचच पश्चिमेकडेही युती दिसून येईल. या दोन ग्रहांमध्ये अर्थातच शुक्र अधिक चकमदार दिसेल. गेल्या सोमवारी मंगळ पृथ्वीच्या अतिशय जवळ आला होता. गेल्या दोन वर्षांच्या काळातील या दोन ग्रहांमधील हे सर्वात कमी अंतर होते. आता अंतराळप्रेमींना ही आणखी एक संधी मिळाली आहे.