तुम्ही परिश्रम करूनही सतत पैशाची तंगी असते ? असे होण्यामागे काय कारण असेल बरं ? तुमच्याकडून चुकून अशा गोष्टी होतात की ज्यामुळे लक्ष्मी रुष्ट होते. लक्ष्मी नाराज झाल्याने तुम्हाला सतत पैशाची चणचण भासते.
- वेद-पुराणांनुसार जो माणूस सूर्योदयानंतरही झोपतो किंवा सूर्यास्ताच्या वेळी झोपतो त्याच्यावर लक्ष्मी रुष्ट होते. याशिवाय दिवसा झोपल्यामुळेही लक्ष्मी नष्ट पावते.
- घरात किंवा दुकानात दुर्गंधी असेल तर लक्ष्मी नाराज होते.
- घरात आरडा-ओरडा किंवा सतत भांडणे होत असतील तर लक्ष्मी त्या घरात निवास करत नाही.
- ज्या घरात सतत नवरा बायकोंत भांडणे सुरू असतात तिथे लक्ष्मी राहात नाही.
- ज्या घरात स्वच्छता नसते त्या घरावर लक्ष्मीची कृपा होत नाही.