'जून' महिन्याचे मासिक भविष्य!

वेबदुनिया

गुरूवार, 31 मे 2012 (17:47 IST)
WD
मेष (चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ)
आपला वाईट काळ संपला आहे. जुन्या कामाचा फायदा मिळण्यास सुरुवात होईल. आपण नव्या कामाचा शुभारंभही करू शकता. मित्र आपल्याला मदत करतील. हो, पण कोणावरही डोळे मिटून भरवसा ठेवू नका, नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची पाळी येईल. आणि हो, कुटुंबात लहान-मोठ्या समस्या उद्भवू शकतात. पण आर्थिक बाजू मजबूत राहील.

वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
वेळेची मागणी आहे की तुम्ही सावधानी बाळगावी. प्रवास करण्याआधी इश्वराचे स्मरण नक्की करा. वाहन चालवताना दक्ष राहा. खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा. एखादी शुभ बातमी कळेल. शत्रू तुमच्या बेजबाबदार वागण्याचा फायदा उचललील. आर्थिक पातळीवरही परिस्थिती सामान्य राहील.

मिथुन (का, कि, कु, घ, ड., छ, खे, खो, हा)
कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुठेतरी बाहेर फिरायलाही जाऊ शकाल. शत्रू तुमचे नुकसान करण्यासाठी टपून बसले आहेत, सावध राहा. परिवारात नवा आनंद येणार आहे. कोणालाही उधार देण्यापासून सावध राहा, नाहीतर ते परत मिळवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील.

कर्क ( ही, ह, हे, हो, डा, डी, डू, डे, डो)
अपेक्षित परिणाम मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील. मिळकतीतील वृद्धीने आर्थिक बाजू सुदृढ होईल. आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहा. मित्रांचे वागणे साहाय्यकारी ठरेल. पत्नीचे स्वास्थ्य चिंताजनक राहू शकेल. दीर्घ प्रवास थकवणारे ठरतील. हवेत गप्पा मारणे ठीक नाही.

सिंह (मा, मी, मू, मो, टा, टी, टू, टे)
कुठल्याही कागदपत्रांवर सही करण्याआधी योग्यरीत्या पडताळणी करा. तुमच्या वागण्यामुळे आसपासच्या लोकांना त्रास होऊ शकतो. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. इतरांच्या प्रकरणात उगीचच नाक खुपसू नका. हा महिना तुमच्यासाठी मिळता-जुळता असणार आहे. डॉक्टरकडे जाणे होऊ शकेल.

कन्या (टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो)
धार्मिक कार्यात रूची वाढेल. एखाद्या धार्मिक क्षेत्राची यात्रा घडू शकते. एखादा नवा व्यवहार ठरवताना कागदपत्रांची योग्यरीत्या शहानिशा करून घ्या. नव्या जबाबदाया तुमच्यावर मानसिक दबाव टाकू शकतात. महिनाअखेरीस काही पाहुणे तुमच्या घरी येऊ शकतात.

तूळ (रा, री, रु, रे, रो, ता, ती, तू, ते)
थोडा नीट विचार करुनच कोणत्याही कामात हात टाका. नव्या कामाची सुरुवात करण्याआधी प्रत्येक पैलूची आधीच माहिती मिळवणे आवश्यक आहे. कोर्ट-कचेरींपासून दूर राहणे ठीक होईल. कोणालाही उधार देणे टाळा, कारण यात तुमचे पैसे बुडू शकतील.

वृश्चिक (ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू)
सर्व प्रयत्नांतीही काम होईलसे दिसणार नाही, मेहनतीच्या तुलनेत फळ मिळणार नाही. जोडीदाराशी आपले वागणे ठीक राहणार नाही. आई-वडिलांच्या प्रसन्नतेची पूर्ण काळजी घ्या. अपत्यांकडूनही चांगली बातमी समजणार नाही. शत्रू हावी राहतील.

धनु (ये, यो, भ, भी, भू, धा, फा, ढा, भे)
तुमच्यासाठी काहीतरी रचनात्मक करण्याची वेळ आली आहे. कला आणि साहित्यांशी संबंधित लोकांसाठी अनुकूल वेळ आहे. स्वास्थ्य उत्तम राहील, जोडीदार आणि मित्रांचा सहयोग प्राप्त होईल. परिवारात सुख-शांती राहील. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ चांगली आहे. अडकलेले पैसे परत मिळतील.

मकर (भो, जा, जी, खी, खू, खे, गो, गा, गी)
धन लाभ होण्याचे योग. सासरकडून साहाय्य. मित्रांसोबत शहराबाहेर फिरण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. तुम्ही जे मेहनतीचे रोप आधी रोवले होते त्याची फळे खाण्याची वेळ आली आहे. पण घाई-गडबडी करू नका नाहीतर पश्चाताप करावा लागेल. भौतिक सामान खरेदी केल्याने वैभवात वाढ होईल. शत्रूंना वाटूनसुद्धा तुमचे नुकसान करता येणार नाही.

कुंभ (गू, गे, गो, सा, सि, सु, से, सो, द)
सुदैवाने होणारी कामे बिघडतील. साहित्यिक क्षेत्रातील लोकांसाठी वेळ खूप चांगली आहे. तुम्हाला मेहनतीचे फळ मिळेल. नव्या नोकरीची संधी आहे. शिक्षणासाठी विदेशात जाण्याचे योग आहेत. कायदेशीर बाबी त्रास देऊ शकतात. नकारात्मक लोकांपासून दूरच राहा. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळेल.

मीन (दी, दू, थ, झ, य, दे, दो, ची)
धन जरा संभाळून खर्च करा. तुमची बेपर्वाई तुमचे नुकसान करू शकते. कुठेतरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. हा ब्रेक तुम्हाला गरजेचा आहे. कारण याने तुम्ही ताजेतवाने व्हाल आणि तुमच्या भविष्यासाठी तयारी करू शकाल. जोडीदाराचे वागणे खटकणारे असेल. तुमचा राग त्यात आणखी भर टाकू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. बाहेर खाणे टाळा.

वेबदुनिया वर वाचा