6 जूनला शुक्राचे अधिक्रमण

ND
यावर्षी 6 जून 2012 रोजी खगोलशास्त्रातील अतिशय दुर्मीळ घटना घडणार आहे, ती म्हणजे शुक्राचे अधिक्रमण (ट्रान्झिट). या घटनेला खगोलशास्त्रात फार महत्त्व आहे. सर्वांच्या आयुष्यात शुक्राचे अधिक्रमण पाहण्याची ही शेवटची संधी असेल; कारण शुक्राचे यापुढील अधिक्रमण तब्बल 105 वर्षांनी, म्हणजेच 10 डिसेंबर 2117 रोजी होणार आहे.

6 जून २0१२ रोजी सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी शुक्र सूर्यबिंबावर असताना सूर्योदय होणार आहे. सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी शुक्रबिंब सूर्यबिंबावरून बाहेर पडायला प्रारंभ होणार आहे. सकाळी 10.23 वाजता संपूर्ण शुक्रबिंब सूर्यबिंबावरून बाहेर पडल्याने दिसू शकणार नाही.

बुध आणि शुक्र या ग्रहांच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षा पृथ्वी कक्षेच्या आत असल्याने हे दोन ग्रह सुद्धा सूर्य आणि पृथ्वी यांच्यादरम्यान येऊ शकतात. मात्र या ग्रहाची बिंबे सूर्यबिंबापेक्षा लहान असल्याने हे ग्रह चंद्राप्रमाणे सूर्यबिंबाला झाकू शकत नाही. बुध किंवा शुक्र बिंबाच्या सूर्यबिंबावरून होणार्‍या प्रवासाला अधिक्रमण असे म्हणतात.

वेबदुनिया वर वाचा