शुक्र स्वतः:च्या राशीत, तुमच्यावर त्याचा परिणाम काय होणार
शुक्र ग्रहाने 17नोव्हेंबरपासून तुला राशीत परिभ्रमण करणे सुरू केले आहे. तुला राशीत भ्रमण करताना शुक्र विभिन्न राशीच्या जातकाला शुभ-अशुभ परिणाम देईल! तर आपण बघूया कोणत्या राशीवर त्याचा काय प्रभाव पडेल.
मेष- धर्मपत्नीला आजारपण येऊ शकते व नीच वृत्तीच्या लोकांसोबत संबंध कायम होऊ शकतात. स्त्री द्वारा धन हानी व पारिवारिक कलह निर्माण होण्याची शक्यता आहे.
वृषभ- मानहानी होऊ शकते. खर्चात वाढ व राज्यामुळे नोकरीत अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
मिथुन- वैवाहिक दांपत्याला अपत्याचे सुख संभव. शत्रूंपासून सुटकारा मिळेल, मोठे अधिकार्यांकडून सन्मान व समाजात मान मिळेल.
कर्क- प्रभाव व प्रभुत्वात वाढ होईल. धनप्राप्तीचे योग आहे. चांगल्या व्यक्तींशी मित्रता होईल. अविवाहितांच्या विवाहाचे योग जुळून येतील व कार्यस्थळात धन प्राप्तीचे योग.
सिंह- पद प्राप्ती व प्रभुत्वात वाढ होईल व जातकाला धन प्राप्तीचे उत्तम योग आहेत.
कन्या- धन प्राप्तीचे योग, परिवारात वाढ, मुलाचा जन्म व अविवाहितांचा विवाहाचा योग व शुभ कार्य होतील.
तूळ - वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. विद्येत पूर्णता व मुलाचा जन्म, नवीन पदावर पदस्थ होण्याचे योग.
वृश्चिक- सामान्य फल मिळतील, जीवनाच्या यशासाठी उत्तम कार्य घडतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल.
धनू- पूर्ण भौतिक सुख मिळेल. विपरीत लिंगाशी संबंध होण्याची शक्यता आहे. मानसिक सुख व आर्थिक संपन्नता मिळेल.
मकर- कष्टप्रद जीवन तणाव निर्माण करतो, पण मित्रांच्या सहयोगाने आपले कार्य पूर्ण होतील.
कुंभ- शारीरिक सुख मिळेल आणि भौतिक सुखाची पूर्णता राहील. गृहस्थ सुख उत्तम.
मीन- शारीरिक सुख व धनप्राप्तीचे योग आहे. याचबरोबर जातकाला जमीन-जायदादची प्राप्ती होईल.