नवीन आठवडा आणि तुमचे भविष्य!

वेबदुनिया

सोमवार, 2 एप्रिल 2012 (11:07 IST)
WD
मेष (चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ)
आपले नवे घर बनू शकते. व्यापारात गती सामान्य राहील. राजनैतिक क्षेत्रात आपले वर्चस्व वाढू शकेल. विरोधक आपल्यासमोर मात खातील. हो, फालतू कायदेशीर प्रकरणात फसण्यापासून वाचा. थोड्या विशेष व्यापारी वर्गाला लाभ होऊ शकेल.

वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
ठरवलेले काम मोठ्या मुष्किलीने होईल, अधिकारींसोबतची जवळीक टाळा. उदरनिर्वाहासाठी आपापल्या क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना आपल्या सहकारी लोकांसोबत जुळवून घेणे आवश्यक ठरेल. आपण आपल्या पराक्रमाने परिस्थितीला सकारात्मक बनवण्यात सफल व्हाल.

मिथुन (का, कि, कु, घ, ड., छ, खे, खो, हा)
ही वेळ निव्वळ योजना आखण्याची नाही तर त्यावर अंमलबजावणी करण्याची आहे. अचानक एखाद्या दूरवरच्या प्रवासाला जाऊ शकता. जीवनात नवा आनंद प्राप्त होणारच आहे, खुल्या मनाने त्याचे स्वागत करा. एकाग्रचित्ताने काम करा, यश नक्की मिळेल.

कर्क ( ही, ह, हे, हो, डा, डी, डू, डे, डो)
तुमच्या हुकूमशाही वागण्यामुळे तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागेल. काही नवे सुरू करणे टाळा. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. गुंतवणूक करण्याआधी जाणकारांचा सल्ला घ्या.

सिंह (मा, मी, मू, मो, टा, टी, टू, टे)
चिकित्सकाजवळ जाणे तुमच्यासाठी उत्तम ठरेल. जोडीदाराचे तुमच्याप्रतीचे वागणे साहाय्यकारी असेल. स्पर्धेला घाबरू नका, त्याचा आनंद लुटा. मग पाहा काम करताना किती मजा येते ती. धार्मिक कृत्यांप्रती रूची वाढवा.

कन्या (टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो)
तुमच्या मेहनतीचे कौतुक तर होईल पण यासह शत्रूंचे तुमच्याप्रती वैमनस्य वाढेल. वेळॆचे नीट नियोजन केल्यास अडलेली अनेक कामे होऊ शकतील. यावर ध्यान देण्याची गरज आहे.

तूळ (रा, री, रु, रे, रो, ता, ती, तू, ते)
धनाचे योग सामान्य आहेत. धार्मिक कार्यात वेळ दिल्यामुळे लाभ होईल. आविवाहितांच्या जीवनात प्रेमाची झुळूक येऊ शकते. दान दिल्यामुळे लाभ होईल.

वृश्चिक (ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू)
जीवनात संघर्षाचा काळ सुरू होत आहे. तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला या कठीण काळातून बाहेर काढील. प्रॉपर्टी वगैरेत गुंतवणूक करण्यासाठी वेळ अनुकूल नाही. तब्येतीची काळजी घ्या, बाहेर खाणे टाळा. जोडीदार आणि अपत्यांकडून त्रास होण्याची शक्यता आहे.

धनु (ये, यो, भ, भी, भू, धा, फा, ढा, भे)
तुमच्यासाठी काहीतरी रचनात्मक करण्याची वेळ आली आहे. कला आणि साहित्यांशी संबंधित लोकांसाठी अनुकूल वेळ आहे. स्वास्थ्य उत्तम राहील, जोडीदार आणि मित्रांचा सहयोग प्राप्त होईल. परिवारात सुख-शांती राहील.

मकर (भो, जा, जी, खी, खू, खे, गो, गा, गी)
सत्पुरुषांच्या साथीने लाभ मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थी वर्गाला फायदा होईल. शत्रू तुमच्यावर हावी होण्याच्या प्रयत्नात आहेत, सावधान राहा. फालतू गोष्टींमध्ये वेळ दवडू नका.

कुंभ (गू, गे, गो, सा, सि, सु, से, सो, द)
यशासाठी नव्या विचारांची गरज आहे. मुलांकडून त्रास होऊ शकतो. जोडीदारासोबत खाजगी वादावरून तणाव राहील. अधिकारींशी संबंधांचा फायदा होईल. नोकरदार लोकांसाठी सामान्य वेळ आहे. आरोग्याची काळजी घ्या.

मीन (दी, दू, थ, झ, य, दे, दो, ची)
करिअरच्या दृष्टीने ही मार्मिक वेळ आहे. तुम्ही प्रगतीशिखर चढू शकता. नव्या जबाबदाया मिळू शकतात. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. मिळकतीचे स्त्रोत वाढतील. धनप्राप्तीचे योग आहेत. सामाजिक कार्यात तुम्ही सतत तत्पर राहाल.

वेबदुनिया वर वाचा