प्रत्येक स्त्री च्या डोक्यावर

गुरूवार, 24 जानेवारी 2019 (12:15 IST)
एक पाण्यानं भरलेली अद्श्य घागर असते .....
तिचा तोल सांभाळतच तिला आयुष्य काढायचे असते....
 
आणि प्रत्येकीच्या घागरीत असते,
विचारांची,जाणीवांची,जबाबदारीची संवेदना आणि सासर-माहेरचा समतोल ठेवूनच तिला चालायचं असतं...
 
आणि ते ही...
मान ताठ ठेऊनच चालायचंय तिने....
आणि चेहर्‍यावर ठेवायचंय खरं किंवा उसनं हसू....
 
घागरीतील पाणी कधी कधी खूप 
हिंदकळते...
कधी शिंतोडे उडवते...
खळखळून तिथल्या तिथेच गिरक्या मारते..
कधी घागरीच्या कडेवर जोरजोरात ठेचकाळते....
पण तरीही ते घागरीतच
राहते.....
 
पाणी हिंदकळताही
उपयोगी नाही
घागर सुटूनही 
चालणार नाही.....
 
पायी काटे, डोईवर रणरणतं उन...
तरीही  ती वाहतेच आहे पाणी युगानूयुगे.....
 
आपल्या वाटणीचा हा पाणवठा भरतेच आहे.....
तन मन थकले तरी ...कर्तव्य तिचे चालू आहे....
 
तरीही ....
पाणी आणि घागरीचा तोल ती आदी काळापासून सांभाळत आहे....
 
असंही एक ऋतूचक्र आणि अशीचही एक तू...
वंदन तुम्हा प्रत्येकीला....

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती