#भाऊ#

शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (12:09 IST)
आई झाली बाबा झाले ताई सुध्दा झाली
भावाबद्दल का बरं कुणीच काही लिहित नाही
 
तोही आहेच की चार शब्द लिहावा असा
जणू काही लपून बसलेला शिंपल्यातील मोती जसा
 
भाऊ म्हणजे जणू काही दुसरा बाबा असतो
जबाबदारीची जाणीव होताच तोच बाबांची जागा घेतो
 
व्यक्त होता येत नाही त्याला आपल्यासारख
त्यालाही मन आहे तरीही का वागतात त्याच्याशी परक्यासारखं
 
लहानपणी प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याबरोबर भांडणारा
मोठं होताच आपले हवे ते हट्ट पुरवणारा
 
ओरडणारा चिडणारा रागाने डोक्यावर घर घेणारा
पण वेळोवेळी तितक्याच समजूतदार पणे वागणारा
 
रक्षाबंधन भाऊबीजेला आपली आतुरतेने वाट पाहणारा
माझी ताई का नाही आली म्हणून डोळ्यातून आसवं गाळणारा
 
एकही दिवस आपल्याशी न भांडता राहणारा
पण क्षणात सगळं विसरून आपले हट्ट पुरवणारा
 
लग्न झाल्यावर परत येऊ नकोस अस आपल्याला बोलणारा
आपण सासरी जाताना धाय मोकलून रडणारा
 
मी नाही बांधणार तुज्याकडून राखी अस बोलणारा
आपल्याला हवी ती ओवाळणी देऊन आपल्या रक्षणाची जबाबदारी घेणारा
 
कितीही भांडला आपल्याशी तरी आपलं दुःख जाणणारा
वेळोवेळी फोन करून आपली चौकशी करणारा
 
लग्न होताच त्याच थोडस बदलणारा
पण तरीही आपल्या ताईला कधीही न विसरणारा
 
आपणही कधी कधी समजून घेऊ त्याला
खरच तोड नाही या बहीण भावाच्या नात्याला
 
रक्ताचा असो वा मानलेला खरच भाऊ बहिणीच नात खूप गोड असते
म्हणूनच आई बाबा गेल्यानंतरही प्रत्येक बहिणीला भावासाठीच माहेरची ओढ असते

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती