बाबा तुमच्या आणि आमच्या लहाणपणात झालेला बदल

बुधवार, 31 ऑक्टोबर 2018 (14:03 IST)
बाबा तुमच्या लहानपणी आणि आता आमच्या लहानपणी काय काय बदल झालेले वाटतात"?
 
बेटा काळ खूप बदलला बघ
 
तेंव्हा पोरांच्या छातीच्या बरगड्या दिसायच्या आणि पोट अगदी पाठीला टेकलेले दिससायचे आता चौथी पाचवीच्या पोरांची पण सुटलेली पोटे दिसतात
 
तेंव्हा पोरं दिवसभर खेळून खेळून रात्री बिछान्यावर अंग टाकले की गाढ झोपत, 
आता पोर दिवसभर बसून 'कॉम्प्युटर गेम्स' खेळून रात्री late night movies एन्जॉय करत जागत बसतात
 
तेंव्हा आमच्या घरात फक्त आजी आजोबांना डोळ्याला चष्मा असायचा 
आता दुसरीची मुलं नाकावरील चष्मे सावरत शाळेत बसतात
 
तेंव्हा वडिलांचा आम्हाला फार धाक असायचा, 
आता पोरं नाराज होऊ नयेत म्हणून त्यांचे डॅड त्यांना ते म्हणतील तेंव्हा हॉटेलात नेऊन ते म्हणतील ते खाऊ घालतात
 
तेंव्हा आम्हांला कधीतरी सणावाराला केलेली पुरणपोळी गोड लागायची रे,
आता मुलांना दररोज झोपेतून उठल्यावर आई मागे लागून खाऊ घालते ते अंजीर, पिस्ते, मनुका पण बेचव लागतात
 
तेंव्हा आमच्या वाढदिवसाला आई एखादा बेसनाचा लाडू हातावर ठेवायची
आता मुलांच्या वाढदिवसाला तोंडाला फासण्यासाठी एक आणि खाण्यासाठी एक असे दोन मोठे केक्स लागतात
 
मुळात काय की,
 
तेंव्हा आम्हांला फार काही मिळत नसतांनाही आनंदात जगता यायचं
 
            आता
 
बरंच काही मिळत असूनही आनंदी जीवन कसे जगावे यांवरील  'सेमीनर्स' अटेंड करावे लागतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती