आणि दुःख confuse होतं....

गुरूवार, 16 ऑगस्ट 2018 (11:07 IST)
त्रासाने भरलेल्या खोक्यावर
मी "आनंद"असं लिहिते
...आणि दुःख confuse  होतं
 
येणाऱ्या प्रत्येक संकटाला
एक छानशी smile देते
...आणि दुःख confuse होतं
 
खरं सांगायचं तर खूप वेळा
मी कोलमडून जाते
सगळं संपलं असं वाटून
अगदी गर्भगळीत होते
कुठूनतरी देव येऊन
माझ्या हातात त्याचा हात देतो
...आणि दुःख confuse होतं
 
संकटाच काय? ती येणारच
आल्यावर थोडं फार छळणारच
आपण स्थिर राहायचं काही काळ
संकटाचं पाणी पाणी होणारच
आलेलं संकट हसता हसता
नकळत नाहीसं होतं
...आणि दुःख confuse होतं
 
किती दिवसाचं हे आयुष्य
आज ना उद्या संपणारच
अमुक आहे-तमुक नाही 
आपलं चालू राहणारच
फाटक्या गोधडीत पाय आखडून
मी सुखाने झोपी जाते
...आणि दुःख confuse होतं
 
म्हटलं तर जीवन सुंदर 
म्हटलं तर वाईट आहे
मग त्याला सुंदर म्हणण्यात 
सांगा काय वाईट आहे? 
जीवनाकडे बघण्याचा
मी चष्मा विकत घेते
...आणि दुःख confuse होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती