काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे सहा दोष आहेत. यांनाच "षडरिपु" असे म्हणतात.
फार्सी भाषेत त्यांना "आएब" असे म्हणतात. हे सहा आएब ज्याच्या अंगी ठासून भरलेले असतात त्याला साहेब असे म्हणतात.
या सहांचा संपूर्ण अंत करणारास संत म्हणतात.
आणि या सहांचा अर्थ नीट समजून घेऊन स्वत:ची आत्मोन्नती करतो त्याला समर्थ म्हणतात.