यंदाच्या उन्हाळी सुट्टीतील सर्वात माहौल मेसेज

यंदाच्या उन्हाळी सुट्टीतील सर्वात माहौल मेसेज 
 
नवरा ऑफिसात असतांना अकोल्याची काजोलबाई मुलांना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी माहेरी अमरावतीला जाते.जेंव्हा नवरा पंकज घरी पोहोचतो , त्याला टीवी जवळ एक नोट चिकटवलेली मिळते -
 
माहेरी जाऊन राह्यली अमरावतीले , पोट्ट्याइले घ्यून. पुढील गोष्टी ध्यानात ठेवजा -
. . 
 
1 - मित्रांना घरी बोलावून घराचा भंगारखाना करू नोका. मागच्या वेळी छबज्यावर 8 रिकाम्या बाटल्या सापडल्या होत्या ....
 
2 - स्वैपाक एक तर घरीच करा किंवा बाहेर गिळून येत जा , पण बाहेरचे आणून घरांत कुणालेही खाऊ घालू नका, मागच्या वेळी सोफ्या खाली पिज़्ज़ा वाल्याचे बिल सापडले होते .हे माहे घर आहे गजानन महाराज संस्थान नाही .
 
3 - चश्मा ड्रेसिंग जवळ ठेवजा , मागच्या वेळी फ्रीज मध्ये सापडला होता .
 
4 - कामावाल्या माधुरीले पगार देऊन जात आहे.
फुकटात दया -माया दाखवायची काहीच गरज नाही.तुमचे सारे चोचले मले माहीत आहेत !
 
5 - सकायी सकायी उठून शेजाऱ्याना जागवुन पेपर आला कि नाही हे विचारायची काही ही गरज नाही .
आपला पेपरवाला त्यायीच्या पेक्षा वेगळा आहे ...आणि दूधावाला  इस्त्रीवाला सुद्धा ...
 
6 - तुमच्या चड्ड्या अलमारीत खालच्या कप्प्यात आहेत , अन् मुलांच्या वरच्या कप्प्यात . मागच्यासारखं बाल्याची चड्डि घालुन जाऊ नका ...
 
7 - तुमच्या सगळ्या रिपोर्ट नॉर्मल आहेत .
उठ सुठ  त्या लेडी डॉक्टरकडे जायची गरज नाही .
 
8 - माह्या बहिणीचा व वहिनीचा बड्डे मागच्या महिन्यातच झाला .रात्री बेरात्री त्यायीले फोन करून, उगाच बड्डे विश कराचा चोट्टेपणा करू नका .. 
 
9 - वाय-फायचा पासवर्ड बदलला आहे.मुकाट्याने लवकर झोपत जा... 
 
10 -जास्त हिडगावू नका कि उड्या मारू नका .कारण मानकर बाई , काळे बाई , जोशी बाई ,  कोल्हे ताई , शिंदे वहिनी , पवार ताई आणि खेडकर ताई सगळ्याच आपापल्या माहेरी जाणार आहेत .
 
11. साखर , पत्ती , कॉफी मागण्याच्या बहाण्याने त्या काळतोंडी  करिश्माच्या घरी जाण्याचा विचार सुद्धा करू नका ! मी सगळ्या वस्तू डबल करून ठेवल्या आहेत ... 
आणि सर्वात महत्वाचे .....
 
12 - जास्त ओव्हरस्मार्ट बनण्याचा प्रयत्न करू नका , अमरावती ते अकोला दीड तासांत पोचता येते .मनांत आलं तेंव्हा , कोणत्याही वक्ती परत येऊ तुमच्या उरावर दळण दळू शकते . उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत .... तुमच्या वाला बैलपोळा नाही

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती