तो गेला चिमणीकडे धावून.
चिमणी आपली पिलातच होती व्यस्त,
कावळा आपला भिजून भिजून त्रस्त.
असेच मग दिवस गेले.. वर्ष सरली.
चिमणीचं पिलू भरारी घेत गेलं परदेशी,
आठवणीनं चिमणी रडे फोटो घेऊन उशाशी.
पिल्लू परदेशातून काळजी घेई, भरपूर पैसे पाठवी..
पैसे नको पिल्लूचं हवं, चिमणी पैसे साठवी.
एके दिवशी आजारी पडली तर कुणीच आलं नाही चिमणीसाठी धावून,
कावळा म्हणाला चिमणीला, विचार फार नको करूस लक्षात ठेव मात्र,
घरच्यांसोबत जोडून ठेवावेत आपुलकीचे चार मित्र.