आधी काळजात रेंज पाहीजे ...

शनिवार, 29 एप्रिल 2017 (16:29 IST)
तेच तेच जगणं
तेच तेच जीवन
रोज रोज तेच
सारख सारख जेवण.
आयुष्यात कधी कधी थोडातरी
चेंज पाहिजे,
ऐकमेकांशी बोलता येते पण आधी
काळजात रेंज पाहीजे.....
 
भाऊ भाऊ दुर झाले
आईबापाच ओझं झालं,
अर्ध अंगण तुझ अन्
अर्ध अंगण माझ झालं.
थोडतरी काळजात आपुलकीचं
कव्हरेज पाहीजे,
ऐकमेकांशी बोलता येते पण आधी
काळजात रेंज पाहीजे....
 
हल्ली घरातल्या घरात
अंगत पंगत बसत नाही
आपुलकी प्रेम जिव्हाळा
दुरदुर दिसत नाही.
घराघरात प्रत्येकाला
आयुष्य अँरेंज पाहीजे,
ऐकमेकांशी बोलता येते पण आधी
काळजात रेंज पाहीजे....
 
ऐकमेकांचे सुखदुःख 
ऐकमेकांनीच वाटायचं
आपुलकीनं मायेनं
ऐकमेकांना भेटायचं.
एकत्र पंगतीत जेवतांनाही 
शेतातलं ताजे व्हेज पाहिजे,
ऐकमेकांशी बोलता येते पण आधी
काळजात रेंज पाहिजे !! 

वेबदुनिया वर वाचा