जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता तेव्हा काय होते?

गुरूवार, 31 ऑक्टोबर 2019 (13:22 IST)
१) भिकाऱ्यात पण माणूस दिसायला लागतो.
 
२) चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागते.
 
३) प्रेम आणि वासना यातला फरक कळायला लागतो.
 
४) एखाद्याची चूक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते.
 
५) कोणत्या ठिकाणी बोलावे आणि कुठे बोलू नये हे कळते.
 
६) चाकू, बंदूक यांच्यापेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते.
 
७) आई वडिलांची किंमत कळायला लागते.
 
८) ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण…. या गोष्टी म्हणजे पूर्णं जीवन संपले हा गैरसमज दूर होतो.
 
९) या गोष्टी पण इतर गोष्टी सारख्याच सामान्य वाटायला लागतात.
 
१०) प्राण्यांबद्दल आपुलकी वाटायला लागते.
 
११) सोशल मिडिया वर हसऱ्या चेहऱ्याचे फोटोज टाकून खूश आहेत असं दाखवणारे लोक खऱ्या आयुष्यात किती दुःखी आहेत हे समजते.
 
१२) कलाकार चित्रपटात नाटक/काम करतात. खऱ्या आयुष्यात पण खूप नाटकं करणारी कलाकार आपल्या जवळ असतात हे पण समजते.
 
१३) या जगात १% चांगली लोक आहेत आणि १% वाईट लोक आहेत.राहिलेले आपण सर्व फक्त अनुयायी आहोत, काहीजण चांगल्या लोकांचे अनुकरण करून चांगले होतात तर काहीजण वाईट लोकांचे अनुकरण करून वाईट होतात, हे पण समजते. 
 
१४) प्रोत्साहनामुळे हरलेला व्यक्ती जिंकू शकतो, हे समजायला लागते.
 
१५) हरल्यावर किंवा नापास झाल्यावर आत्महत्येचा विचार पण मनात येत नाही.
 
१६) जीवन जगण्याची नवी उमेद,एक ऊर्जा निर्माण होते.
 
१७) आयुष्याच्या प्रति संवेदनशील भावना निर्माण होते.
 
१८) एकमेकांच्या सुख:दुःख ची तीव्रता कळते.
 
१९) करोडोंची संपत्ती असणाऱ्या मध्ये गरीब तसेच दिवसाचे २००/- कमावणाऱ्यामध्ये श्रीमंत दिसायला लागतो...!
 
२०) आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर करण्यासाठी  संघर्ष करण्याची प्रेरणा देतं.
 
चला मग आयुष्य सुंदर आणि सक्षम करण्यासाठी जसं होईल तसं वेळ काढून पुस्तकं वाचूया जेणे करून आपलं जीवन अर्थपूर्ण आणि समृद्ध बनेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती