लग्नात ( बुफे ) जेवणात ती मजा नाही, जी पंगतीत येते

मंगळवार, 26 जुलै 2016 (16:17 IST)
जसं की -
1) सर्वात पहिले जागा पकडणे...
2) मग बिना फाटलेली पत्रावळी घेणे.....
3) चपला, बुटांकडे अर्ध लक्ष देणे...
4) मग पत्रावळी उडू नये म्हणुन त्यावर पाण्याचा ग्लास ठेवणं...... 
5) मीठ वाढणार्याला इथेच टाक म्हणणे 
6) दोन बोट दाखवून दोन गुलाबजामुन टाकायला सांगणे..... 
7) पुरी गरम गरम बघुन घेणे. 
8) मागच्या पंगतीत वाकून बघायचं. तिकडे काय काय
वाढलंय आणि आपल्या पंगतीत काय काय
वाढायचं बाकी आहे ते बघणे..... 
9) जर काही बाकी असेल तर ओरडून ते वाढणार्याला बोलावणं..... 
10) शेजारी कोणी ओळखीचा असेल तर त्याला बळजबरी उरलेली पुरी देणं..
11) पाणी वाढणारा लान्बुऩच येताना दिसला की पाणी पिऊन परत ग्लास भरुन घेणं..... 
12) पहली पंगत कधी उठणार याचा अंदाज घेउन दुसर्या पंगतीसाठी अडजस्ट करायला बघणं......
13) कढी  चा तर विषयच निराळा 
14) आणि सर्वात शेवटी पाणीवाल्याला ग्लास घेऊन शोधणं.... 
खरच पंगतीतलं जेवन
कुणी कुणी हा अनुभव एन्जॉय केलाय त्याने हात वर करा..
ज्याने नसेल अनुभवला तर त्याने आपण कुपोषित आहोत असे समजावे.. 

वेबदुनिया वर वाचा