मराठी विनोद : माझ्याजवळ तेवढा पैसा कुठे आहे?

गुरूवार, 14 ऑगस्ट 2014 (16:43 IST)
डॉ. लोभे यांनी एका रोग्याला तपासून सांगितले, 'तुमच्यावर ताबडतोब ऑपरेशन करायला पाहिजे, नाही तर तुम्ही चार दिवससुद्धा जगणार नाही.' 'ऑपरेशन करायला काय खर्च येईल?' रोग्याने विचारले. 'दोन लाख रुपये.' 'दोन लाख?'

रोग्याने आश्‍चर्याने विचारले. 'माझ्याजवळ तेवढा पैसा कुठे आहे? मी फार तर दरमहा वीस हजार देऊ शकेन.' डॉ. लोभे थोडा विचार करून म्हणाले, 'काही हरकत नाही. हजार रुपये व्हिजिट फी द्या आणि मी लिहून देतो त्या पाच रुपयांच्या गोळय़ा महिनाभर खा. असे वर्षभर कराल तर खडखडीत बरे व्हाल.'

वेबदुनिया वर वाचा