नवीन कविता: आगीनगाडी

सर्वानी झाडे लावा नाही तर ही नवीन कविता पाठ्यपुस्तकात येईल........
झुक झुक झुक झुक आगीनगाडी कविता
 
झुक झुक झुक झुक आगीनगाडी
पान्याचे डबे आणून सोडी
वाळकी झाडे पाहूया
 
मामाच्या गावाला जाऊया
मामाचा गाव मोठा
पाण्याचा लय तोटा
हंडा रांगेत लावूया
मामाच्या गावाला जाऊया
 
मामाची बायको सुगरण
पाण्यासाठी फिरते वणवण
बिनआंघोळीचे राहूया
मामाच्या गावाला जाऊया
 
मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली कार्टी
पाण्यासाठी भांडुया
मामाच्या गावाला जाऊया
 
मामा मोठा तालेवार
आंघोळीच्या गोळ्या आनल्यात चार
कोरड्या पाण्याने न्हाऊया
मामाच्या गावाला जाऊया

वेबदुनिया वर वाचा